Narhari Zhirwal | नरहरी झिरवळांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर मारल्या उड्या…; नेमकं प्रकरण काय? 

0
71
#image_title

Narhari Zhirwal | राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या आहेत. ही घटना घडण्यापूर्वी झिरवळांनी काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

Narhari Zhirwal | धनगर आरक्षणाला झिरवाळांचा कडाडून विरोध; धनगर-आदिवासी आरक्षण मुद्दा पुन्हा पेटला

या भेटीतून काही निष्पन्न न झाल्याने झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या असल्याच्या चर्चा आहेत. तर “मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल…. ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे” असे वक्तव्य नरहरी झिरवळांनी काही तासांपूर्वी केले होते.

मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू

मागील काही दिवसांपासून नरहरी झिरवळ आदिवासी समाजासाठी आंदोलन करत असून त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. ‘एसटी’च्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी आमदारांची मुख्य मागणी होती तसेच ‘पेसा’ कायदे अंतर्गत भरती करण्याची मागणी आमदारांकडून केली जाते आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे मंत्रालय हादरून केले असून राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Narhari Zhirwal | धनगर आरक्षावरुन महायुतीत वाद?; नरहरी झिरवळ सरकारविरोधी भूमिकेत

मंत्रालयात झिरवळांचा ठिय्या मोर्चा

जाळीवरील आंदोलनानंतर झिरवळांची प्रकृती बिघडली होती, रक्त्यातदाब वाढला होता. पोलिसांकडून सर्व आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून नंतर मंत्रालयात डॉक्टरांकडून त्यांची तपासणी झाल्यानंतर झिरवळांनी आपल्या सहकारी आंदोलकांबरोबर ठिय्या आंदोलन सुरू केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here