Murder news : काकूने शरीर संबंधांना दिला नकार पुतण्याने केले काकूला ठार


Murder news : पुतण्या सोबत शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणाने आपल्या ४८ वर्षाच्या काकूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेन्नईमधून समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. नवी दिल्ली, मणिपूर, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि पाठोपाठ महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महिलांचा विनयभंग, बलात्कार, मारहाण, लैंगिक शोषण यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे देशभरातील महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असतांनाच तमिळनाडूच्या चेन्नईमधून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे फक्त घराबाहेरच नाही तर घरातही महिला सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झाल आहे.

नेमकं काय घडलं

तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी असलेल्या कोडुंगैयूर मध्ये राहणाऱ्या ऑगस्टीन अरुण हा २१ वर्षीय तरुण आपला मित्र सोलोमन(वय २२ वर्ष) याच्यासोबत दुपारच्या सुमारास आपल्या काकूच्या घरी गेले. यावेळी आपला पुतण्या व त्याचा मित्र घरी आल्याने दोघांचे आदरातिथ्य केले.यावेळी  ऑगस्टीन काकूच्या मागे किचन मध्ये जाऊन त्याने तिला मागून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला काकूने विरोध केला. मात्र त्याने आग्रह धरला व अश्लील भाषेत बोलायला सुरुवात केली.

यावेळी संतप्त झालेल्या काकू ने त्यांना निघून जाण्यासाठी सांगितले व या ठिकाणाहून गेला नाहीस तर तुझ्या आई-वडिलांना ही घटना सांगेल अशी धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या ऑगस्टीन याने तिला मारहाण करत तिचं डोकं भिंतीवर आदळले. यावेळी वेदनेने विव्हळत असलेल्या काकूला त्याने मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार केल्याने त्यांनी पुन्हा पुन्हा तिचं डोकं भिंतीवर आदळून तिला ठार केलं.

https://thepointnow.in/tilak-award-history/

यांनतर तिच्या मृतदेहा सोबत अश्लील वर्तन देखील त्याने केलं. काही वेळानंतर ऑगस्टिन आणि त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोघांनाही काही तासातच अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल आहे. यातच सख्ख्या पुतण्याने आपल्या काकूने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तर वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षितते सोबतच संतापाचं वातावरण देखील निर्माण झालं असून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!