Mumbai News | रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये काढत होता मुलीचा ‘तसा’ व्हिडिओ

0
56
Mumbai News
Mumbai News

Mumbai News |  एक संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने बाथरुममध्ये एका महिलेचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना समोर आलेली आहे. दरम्यान, या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून संबंधित आरोपीला अटक केलेली आहे.(Mumbai News)

तसेच फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमांनुसार हा गुन्हा करुन पुढील तपास सुरु केलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गुप्ता असे अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. तो शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत आहे.

रुग्णालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार (दि. २ डिसेंबर) रोजी घडलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरुमध्ये डोकावून महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केलीय आहे. शनिवारी ही २७ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनी ही शताब्दी रुग्णालयामध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेली होती. त्यावेळी फ्रेश होण्यासाठी ती तिच्या वसतीगृहात गेली असता, या वसतीगृहामध्ये पुरुष व महिलांचे स्नानगृह हे शेजारीच असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे(Mumbai News)

 Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मुख्यमंत्री करा…!

नेमंक प्रकरण काय?

शनिवार (दि. २ डिसेंबर) रोजी मुंबईतील शताब्दी रुग्णालयात २७ वर्षीय विद्यार्थिनी कथित एका कॉन्फरन्समसाठी गेलेली होती. त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी तिच्या वसतीगृहावर आली आणि त्यावेळी तिचा बाथरुमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याने तिचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला.

या वसतीगृहात महिला व पुरुषांचे स्नानगृह हे शेजारीच असल्याची माहिती ही इथल्या एका अधिकाऱ्याने दिली होती. त्यावेळी ही विद्यार्थिनी अंघोळ करत असताना रुग्णालयातील एका रोजंदारी सफाई कर्मचाऱ्याने तेथील भिंतीवर चढून तिचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब मुलीच्या लक्षात येताच तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे घाबरून तो तिथून पळून गेला.

हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच पोलिसांत तात्काळ याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला असून, आरोपीला देखील तातडीने अटक करण्यात आली आहे. सध्या या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.(Mumbai News)

Samsung Offer | काय सांगता ? येतोय सॅमसंगचा ‘हा’ चार कॅमेऱ्यांचा भन्नाट फोन

मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे आता रुग्णालय प्रशासनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या या तपासात आणखी कोणत्या गोष्टी उघडकीस येणार आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच रुग्णालय प्रशासनावर पोलीस कठोर कारवाई करणार का? हे देखील तितकच महत्त्वाचं आहे(Mumbai News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here