Mumbai Nashik Highway | गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गाचा प्रश्न हा तापलेला असून, ठाकरे गटानंतर जिल्ह्यातील संघटनांनी याविरोधात आंदोलन पुकारले होते. नुकतंच मंत्री दादा भुसे यांनीही याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत संबंधित विभागांना 8 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भात आढावा घेत अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे सक्त निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.
Nashik-Mumbai Highway ला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा सवाल
महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद
या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा तीन तासांच्या अंतरासाठी ८ ते १० तास लागत आहेत. या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Dadaji Bhuse | आठ दिवसात रिझल्ट द्या अन्यथा कारवाई; मंत्री भुसेंनी यंत्रणेला खडसावले
महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, भिवंडी, कल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांचे समन्वयन करून पुढील १० दिवसांत उपाययोजना राबवाव्यात. १० दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न न सुटल्यास हयगय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
‘या’ उपाययोजना करण्याचे निर्देश
- रस्त्यात एखादे खराब वाहन असल्यास ते वाहन तातडीने दूर करण्यासाठी ४० टनच्या क्रेन्स वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून घ्याव्यात.
- गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची मदत घ्यावी.
- ज्याठिकाणी नवीन कामे सुरू करावयाची आहे. तिथे काँक्रिटीकरण असलेला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम