Mumbai | अर्धी मुंबई रिकामी होणार?; धक्कादायक कारण आलं समोर…

0
12

Mumbai |  देशाची आर्थिक राजधानी तसेच राज्याची राजधानी असलेली मायानगरी मुंबईत राहण्याचे अनेक जणांचे स्वप्न असते. मुंबईला स्वप्नांची नगरी असेही म्हटले जाते.

त्यामुळे मुंबईत स्वतचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते.  नोकरीच्या निमित्तानं किंवा शिक्षणाच्या आणि इतर अनेक कारणांनी तरुण वर्ग आणि अनेकांचेच पाय ह्या मुंबईकडे वळतात. स्वप्ननगरी असणाऱ्या ह्या मुंबईत लोकसंख्याही तितकीच आहे. पण आता याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

आता अनेकांची जन्मभूमी तसेच कर्मभूमी असणाऱ्या ह्या मुंबईतील नागरिक हे मोठ्या संख्येने नागरिक हे शहर सोडण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई शहरातील नागरिकांना अनेक अडचणी तसेच समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी ह्या मुंबई शहरातील दर १० पैकी ६ नागरिक हे या मुंबई शहरातून बाहेरच्या शहरांत स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत.(Mumbai)

एका सर्व्हेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. प्रदूषणाची धोकादायक पातळी, त्यामुळे व्यायामावर लागलेला विराम व त्याचे शरीरावर, जीनशैलीवर होणारे वाईट परिणाम ह्या कारणांमुळे येथील रहिवासी नागरिक हे आता असा स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे लवकरच आता मायानगरी मुंबई ही रिकामी होण्याची शक्यता आहे.(Mumbai)

Crime News | दोन बायका, ९ मुलं अन् ९ गर्लफ्रेंड; सोशल मीडिया स्टारला झाली अटक

ह्या सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास १० पैकी ९ नागरिकांना मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास व इतर अशा आरोग्यविषयक समस्या सतावू लागल्या आहेत. तसेच दमाचा आजारही डोकं वर काढू लागला असून, ह्या रुग्णांमध्ये साधारण ४० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

ह्या सगळ्या गोष्टींना केवळ मुंबईतील प्रदूषित वातावरण हेच कारणीभूत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या शहरांत स्थलांतरित होण्याचा विचार करण्यास सुरुवात केलेली आहे. अनेकांना आसरा देणाऱ्या ह्या स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई शहरातील वाढती गर्दी, पायाभूत सुविधांवर येणारा ताण तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या किंवा अडचणी या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही.(Mumbai)

दरम्यान, मुंबई ह्या शहरामध्ये परराज्यातील नागरिकांपासून ते परदेशातील नागरिकांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ह्या शहरमुळे अनेकांचे वैभव हे वाढले असून, अनेकांनी या शहरातून मोठी प्रगतीदेखील साध्य केलेली आहे. त्यामुळे आता वाढत्या प्रदूषणामुळे खरंच मुंबईकर हे इतर ठिकाणी स्थलांतरित होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. (Mumbai)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here