Mumbai | मूल होत नव्हते, म्हणून महिलेने…; हे प्रकरण एकदा वाचाच

0
32
Mumbai
Mumbai

Mumbai |  स्वप्न नगरी मुंबईमधून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या एका रुग्णालयात चक्क एका नवजात शिशूची चोरी झाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असताना तपासतून काही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

लग्न होऊन दीड वर्ष झाले तरीही मूल होत नसल्यामुळे संबंधित महिलेने महिलेने मुंबईच्या कांदिवली येथी शताब्दी रुग्णालयातून नवजात मूल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंदिवली पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मूल चोरणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेने केवळ २० दिवसांचे नवजात बाळ रुग्णालयातून चोरले होते. दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.(Mumbai)

Mumbai | आज सकाळीच ‘ईडी अस्त्र’ बरसलेला ठाकरेंचा ‘तो’ नेता कोण..?

Mumbai | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, संबंधित महिला ही शताब्दी रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या विभागात गेली. त्यानंतर तेथे एका वीस दिवसांच्या नवजात मुलाच्या आईसोबत तिने संवाद साधला आणि फूस लावत तिने बाळाच्या आईला विश्वासात घेतले. त्यानंतर संबंधित आरोपी महिलेने मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी बाथरुममध्ये पाठवले. “तुम्ही जा, मी बाळाजवळ थांबते, चिंता करु नका, असे सांगितले. (Mumbai)

मुलाची आई बाथरुमध्ये गेली आणि आता मुलाजवळ कोणीच नाही, ही संधी साधत कोणच्याहि नजरेत न येता, मुलाला घेऊन ती फरार झाली. आधी मुलाला घेऊन ती मालवणी येथे गेली होती. त्यानंतर मग तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Police | राज्यात पोलिसच सुरक्षित नाही; ८ महिला पोलिसांवर बलात्कार

का केली होती चोरी

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेतले असून, तिची सखोल चौकशी केली असता. तिने सांगितले की, दीड वर्षांपूर्वी तिचे लग्न झालेले होते. मात्र त्यांना मूल होत नव्हते. त्यामुळे महिलेने मुलाची चोरी करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येत असतात. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेचं काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Mumbai)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here