MPSC 2022 | राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 मधील उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला सुरुवात होते आहे. महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये मुलाखत घेण्याचे नियोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेले आहे. त्यानुसार नाशिक शहरात मंगळवार (दि. ५) पासून मुलाखत प्रक्रियेला सुरवात होईल.
Gold Silver rate | सोन्याने मोडला रेकॉर्ड; असे आहेत आजचे दर..?
कोरोना महामारीमुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडलेले होते. त्यामुळे 2022 च्या नियोजित परीक्षांची प्रक्रिया अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही. परिस्थिती पूर्वपदावर आलेली असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जलद गतीने प्रक्रिया राबविली जात आहे. पूर्व परीक्षेतून राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 ला पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. निवड अंतिम टप्प्यात आलेली असल्याने उमेदवार सध्या मुलाखतीच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत. त्यासाठी शिक्षक, शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अनेक उमेदवार घेत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
Deola | नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश; नुकसानग्रस्त पिकांची आ. राहुल आहेर यांनी केली पाहणी
कसे आहे मुलाखतींचे नियोजन?
आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) आणि शुक्रवारी (दि. १ डिसेंबर) असे दोन दिवस आणि ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत नवी मुंबईमधील सीबीडी बेलापूर येथील आयोगाच्या कार्यालयात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेदेखील मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एकूण एक हजार 168 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम