Deola | नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश; नुकसानग्रस्त पिकांची आ. राहुल आहेर यांनी केली पाहणी

0
2

सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : Deola |  देवळा तालुक्यात रविवारी (दि. २६) रोजी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आमदार डॉ. राहुल आहेर यांनी काल मंगळवारी (दि. २८) रोजी पाहणी करून अधिकाऱ्यांना या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. देवळा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वाजगाव, खर्डे आणि कणकापूर येथील द्राक्ष उत्पादकांना बसलेला आहे.

देवळा | गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई-आ. डॉ. राहुल आहेर
देवळा तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. यामुळे मका उत्पदनात मोठ्या प्रमणावर घट दिसून येत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने लाल कांद्याची लागवड सुद्धा जेमतेम असून तालुक्यात नगदी पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या उन्हाळी कांदा लागवडीसाठी तयार रोपे पाण्याअभावी इतरत्र ठिकाणी विकून टाकले आहे. तालुक्यात यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवड देखील जेमतेम पहावयास मिळत आहे. यामुळे तालुक्यात यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

देवळा तालुक्यातील पूर्व भागात वाजगाव, खर्डे येथे अर्ली द्राक्ष उत्पादन घेणारे बहुतांश शेतकरी आहेत. त्यांनी पाणी टंचाईमुळे विकतचे पाणी घेऊन द्राक्ष बागा वाचवल्या आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसनाने ह्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ह्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात अभ्राछदित वातावरण, अवकाळी पाऊस यानंतर पडलेले दाट धुके यात काढणीयोग्य असलेल्या लाल कांद्याचे त्याच प्रमाणे द्राक्ष, टोमॅटो, कांदा रोप आणि इतर भाजीपाला पिके नेस्तनाबूद झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आधीच कोणत्याही शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असताना यात अवकाळी पाऊसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची झालेली वाताहात पाहून शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

Horoscope Today 29 nov: या राशीसाठी आजचा दिवस निर्णायक; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
देवळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त मंगळवारी (दि. २८) रोजी प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी तालुक्यातील पूर्व भागातील वाजगाव, खर्डे, कणकापूर येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांना भेटी देऊन प्रशासनाना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी ना. डॉ. भारती पवार यांचे स्वीय सहायक प्रवीण रौंदळ, तहसीलदार विजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सीताराम चौधरी, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तलाठी उमेश गोपनारायण, ग्रामसेविका जयश्री भामरे आदींसह अपदग्रस्त शेतकरी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here