Gas Cylinder – गॅस सिलिंडर दरात 200 रुपयांचा दिलासा

0
3

Gas Cylinder Rates : महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय शासनाने जाहीर केला आहे. आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या मुदतीत आणखी एक वर्षाची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (Gas Cylinder Subsidy)

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता 9.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना एका वर्षासाठी प्रति गॅस सिलेंडर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. एका वर्षात 12 गॅस सिलेंडर वर ही सबसिडी लाभार्थ्यांना मिळेल.

जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या महागाईची प्रचंड झळ बसतांना दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील होत आहे. खाद्यपदार्थापासून ते इंधनापर्यंत सारेच महागाईच्या गर्तेत सापडले आहे.

Baba On Burning Stove – चुलीवरचे मटण अन आईस्क्रीम ऐकली; आता आलेत चुलीवरचे बाबा!

नुकतंच शासनाद्वारे व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि घरगुती गॅस सिलेंडर चे दर वाढवण्यात आले होते. मात्र आता शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा लाभार्थ्यांना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मात्र एक वर्षानंतर काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. देशात सध्या राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेले आहे. त्यात एकामागे एक वाढत्या महागाईच्या झटक्यांनी सामान्य नागरिक पुरता त्रस्त झालाय. यामुळे कुठेतरी हा काहीसा महागाईच्या झळांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न तर शासनाकडून नाही ना? अशीच चर्चा होऊ लागली आहे. (Gas Cylinder Subsidy)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here