Skip to content

Baba On Burning Stove – चुलीवरचे मटण अन आईस्क्रीम ऐकली; आता आलेत चुलीवरचे बाबा!


Baba On Burning Stove – आत्तापर्यंत आपण अनेक प्रकारचे बाबा ऐकले असतील. झाडावर राहणारे बाबा, गुहेत राहणारे, जंगलात राहणारे बाबा. आणि आता एक चुलीवरचे बाबा प्रकट झाले आहेत. ऐकावं ते नवलच अशीच गत्या सध्या झालेली दिसते आहे.

सोशल मीडियावर रोजच अनेक नवनवीन गोष्टी येत असतात. आता एका चुलीवर बसलेल्या बाबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आणि तो अकोल्यातला असल्याचे सांगितले जात आहे.

हे बाबा पेटवलेल्या चुलीवर एका लांबलचक तव्यावर बसलेले दिसत आहेत. आणि बिडी पीत आहेत. लोक त्यांच्या पाया देखील पडत आहेत. यामुळे हे बाबा सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

Rain march: शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळीचे ढग घोंगावताय

भारत हा धर्मभोळ्या लोकांनी भरलेला देश आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांना देखील लोक बळी पडतात. यावर अंनिस द्वारे अनेकवेळा लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र लोकांचा विश्वास हा असल्या गोष्टींवरून ढळत नाही.

आत्तापर्यंत आपल्याला चुलीवरचे मटण, चुलीवरची मिसळ, चुलीवरची आईस्क्रीम पाहायला मिळाली होती. आणि आता चुलीवरचे बाबा मार्केटला ट्रेंडिंग आहेत.

आता हे बाबा नेमके कोण आहेत? ते अशा पेटत्या चुलीवर, तव्यावर कसे बसू शकतात? हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. वाढत्या सोशल मीडियाच्या वापरात, आता अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्यात आता हे चुलीवरचे बाबा आणि त्यांचा भक्तवर्ग हे सारंच आश्चर्य वाटणारं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!