Rain march: शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळीचे ढग घोंगावताय

0
2

Rain march alert : मार्च महिना म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होत असते, पण पाऊस पडत असल्याने मार्च महिना पाऊसाचा महिना झाला आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरु झाला. आता पुन्हा पाऊस येण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञने व्यक्त केली आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाऊस परत येण्याची शक्यता आहे अस त्यांनी ट्विट करुन सांगितले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकटांचे वादळं अजून दूर होण्याची शक्यता कमी आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा निकाल कधी लागले याची शेतकरी वाट पाहत आहेत. (Rain march alert)

Almonds Benefits: कच्चे बदाम खाल्ल्याने साखर येते नियंत्रणात

का पडतोय पाऊस
दक्षिण किनारपट्टीचा काही भागात ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या मुळे कोकणातील मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस येण्याची शक्यता शास्त्रज्ञने वर्तवली आहे. तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यातही पाऊस पडणार असल्याचे अनुमान हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामानात अनपेक्षित बदल
गेल्या काही दिवसांपासून हवामानात काही प्रमाणात बदल बघायला मिळाले आहे. कधी तापमान मध्ये वाढ दिसायला भेटत आहे तर कधी हवा सह अवकाळी पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे हा बदल बघायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या सकाळी ऊन व दुपारनंतर आकाशात ढग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे . तर शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे

विदर्भावर अधिक संकट
विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. इथे अवकाळी पावसासाठी वातावरण आताच तयार झाले बघायला मिळत आहे. त्यामुळे विदर्भात पुढील आठ दिवस पाऊस असण्याची शक्यता आहे.

पंचनामे तातडीने व्हावे
नाशिक जिल्ह्यात 15 ते 19 मार्च या पाच दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 8079 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 437 गावांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आहे. जवळपास 21 हजार 750 शेतकरीना नुकसान झाले आहे. प्रशासन आणि कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पंचनाम्याचे अहवाल प्रशासनाकडे देण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, पेठ, निफाड, कळवण इथे सर्वाधिक पिकाचे नुकसान झाले आहे. तर आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकरीना चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे ताबडतोब पंचनामे करावें, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. (Rain march alert)

अवकाळी पावसाच्या भीतीने, पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांची गहू पिकाची कापणी करून ते भरडण्याची घाई पहायला मिळतीय.पावसात भिजून पीक वाया जाऊ नये म्हणून गहू भरडणीची कामाला सुरूवात झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here