Skip to content

पीकविमा कंपनीविरोधात आमदार संजय बांगर बनले आक्रमक


हिंगोली : शहरात एका पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत सदर पीकविमा कंपनीच्या कार्यलयात तोडफोड करण्यात आली आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सदर पीकविमा कंपनीने बोगस पंचनामे आणि बनावट सह्यांच्या आधारे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यावर आक्रमक होत आमदार बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणीही नसताना पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची  तोडफोड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक पीडित शेतकऱ्यांनी पिकविमा कंपन्याकडे नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या. परंतु पीकविमा कंपनी परस्पररित्या बोगस पंचनामे तयार करत शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करत सदर अहवाल दाखल केला जात आहे. तसेच या अहवालांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान हे अत्यल्प स्वरूपात दाखवले जात आहे. पण प्रत्यक्षात यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगत सदर पीकविमा कंपनी बनावटपणा करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी आ. बांगर याची भेट घेत त्यांच्याकडे व्यथा मांडल्या. यावेळी बांगर यांनी पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले, परंतु अधिकाऱ्यांनी येण्यास टाळाटाळ केली. अखेर संजय बांगर यांनी थेट पीकविमा कंपनीचा कार्यालय गाठले, मात्र तिथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने आ. बांगर चांगलेच आक्रमक होऊन ते आपल्या कार्यकर्त्यांसह चक्क विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

यावेळी पीकविमा कंपनीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यात संतोष बांगर यांचे कार्यकर्ते पीकविमा कंपनीच्या कार्यलयात वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे. तसेच अनेक कार्यकर्ते या कार्यालयातील खुर्च्या फेकताना, तर संतोष बांगर हेदेखील कार्यलयातील फोन भिंतीवर आपटताना दिसत आहे.

दरम्यान, अद्याप या सर्व प्रकरणाबाबत पीकविमा कंपनीच्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यासंबंधित अद्याप तक्रार नोंदवल्याची माहितीदेखील मिळू शकलेली नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी या घडलेल्या प्रकाराबाबतचे कोणतेही समर्थन नाही केले. पण यासंदर्भात मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील, असे यावेळी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!