Skip to content

मर्दांच्या हाती ‘मशाल’ देणार ; नेहमी प्रमाणे ठाकरेंचा ‘मर्द’ शब्दावर भर देत विरोधकांवर हल्लाबोल


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा 75 वा वाढदिवस आज साजरा झाला यावेळी उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसले नेहमी प्रमाणे त्यांनी मर्द या शब्दावर जोर देत आक्रमक भाषण केले. आता मी मशाल मर्दाना देईन, हेच नियतीला मान्य आहे. हिंमत असेल तर समोर या, माझे आव्हान हिम्मत असेल तर स्वीकारा असे आव्हान देखील शिंदेंना दिले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या वतीने ‘उद्धव ठाकरे’ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे आव्हान दिले. ही निवडणूक ठाकरे गट मशाल चिन्हाने तर शिंदे गट तलवार आणि ढाल चिन्हाने लढत आहे. 

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले,

‘नियतीने काय स्वीकारले हे कोणालाच कळत नाही. तूर्तास, मी मशाल मर्दाना द्यावी, हे नशिबाने मान्य केलेले दिसते. आजच्या काळात प्रत्येक गोष्टीला कोर्टात जावे लागते. उमेदवारीसाठी न्यायालयात जा. मैदान मिळाले नाही तर न्यायालयात जा, एव्हढ करण्याऐवजी समोरासमोर या एकदाच होऊ द्या,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले.

शरद पवार सोबत आहेत, या वादळांची काय औकात ?

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनेवर अशी अनेक वादळे आली आणि गेली. त्यावेळी अनेक वादळी व्यक्तिमत्त्वांनी वादळाचा सामना करताना शिवसेनेला साथ दिली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झंझावाती ताकद आमच्यासोबत आहे. सर्वात मोठे वादळ निर्माण करण्याची क्षमता असलेले शरद पवार आपल्यासोबत आहेत. काळोख असो की शरद ऋतू, ऊन असो वा पाऊस, ज्याचे पाय डगमगत नाहीत, असे व्यक्तिमत्त्व आपल्यासोबत आहे. मला युद्ध आवडते. आगामी लढाईची वाट पाहत आहे असे देखील ठणकावले.

वडिलांप्रमाणे लढा, अजिबात घाबरू नका – फारुख अब्दुल्ला

शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विशेष कार्यक्रमात फारुख अब्दुल्लाही उपस्थित होते. फारुख अब्दुल्ला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, फारुख अब्दुल्ला मला भेटले. त्यांची आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. ते येताच मला म्हणाले अजिबात घाबरू नका वडिलांप्रमाणे लढा असा दावा देखील ठाकरेंनी केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!