दरोडेखोर बंगल्यात घुसला, पालकमंत्र्यांनी त्याला पकडला

0
34

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावी आले असताना येथील एका बंगल्यात हातात पिस्तुल घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोराला पकडले आहे. त्यांच्या या धाडसी कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मालेगाव येथील कलेक्टर पट्टा परिसर हा उच्चभ्रू वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात बहुतांश व्यापारी राहत असतात. याच परिसरातील एका बंगल्यात सदर दरोडेखोर घुसला, व तेथे उपस्थित असलेल्या महिलांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे व दागिन्यांची मागणी केली. यावेळी त्याने त्या महिलेवर प्रतिकार करताच त्यांच्या मुलींनी एकच आरडाओरड केली. नेमके याचवेळी पालकमंत्री हे या मार्गातून जात असताना त्यांना सदर घटना निदर्शनात आली, आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्वरित बंगल्यात घुसत त्या दरोडेखोरास पकडले. नंतर दादा भुसे यांनी सदर दरोडेखोरास मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाला असून भुसे या धाडसाचे कौतुक होत आहे.

शहरातील ऑटो स्पेअरपार्टसचे व्यावसायिक मितेश दोशी यांचा हा बंगला असून घटनेवेळी या घरात त्यांच्या पत्नी व तीन मुली राहत होत्या. दरम्यान, सदर दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर जबरी लुटीची घटना घडल्याने मालेगाव शहर व संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सतत घडणाऱ्या दरोड्यांच्या घटनांनी नाशिक जिल्हा आधीच हादरलेला असताना या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच, या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here