म्हैसवळण घाट एक अपघात प्रवण क्षेत्र; खड्डेमय घाट रस्त्याची दुरवस्था कधी मिटणार प्रवासी वाहनधारकांचा सवाल

0
3

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक-नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण इगतपुरी-म्हैसवळण घाट मार्गे अकोले तालुक्यात जाणाऱ्या म्हैसवळण घाट रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सप्टेंबर २०२२ मध्ये या म्हैसवळण घाट भागात जोरदार अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता या ढगफुटीत म्हैसवळण घाटात अनेक ठिकाणी मोठं मोठ्या दरड कोसळल्या अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला. तर अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला या रस्त्यावर टाकेद गावापासून ते संपूर्ण घाट रस्ता पूर्णपणे खड्डयांच्या साम्राज्यात आजही खितपत पडून आहे.

अकोले तालुक्यातील एकदरा, खिरविरे, कोंभाळणे, कोकनवडी, जायनावाडी, तिरडे, पाचपट्टा, केळी ठाणगाव सह अनेक गावांमधून वाहनधारक प्रवासी,शेतकरी वर्ग इगतपुरी तालुक्यातील टाकेद-घोटी या ठिकाणी बाजारपेठ मार्केट मध्ये रोज मोठ्याप्रमाणात येत असतात तर अकोले आणि इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी शासकीय सेवेत असणारे शिक्षण आरोग्य कृषी यांसह सर्व विभागाचे कर्मचारी, व्यापारी, शेतकरी यासोबतच सर्वतीर्थ टाकेद, पट्टाकिल्ला, बितनगड, विश्रामगड याठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या शैक्षणिक पर्यटन सहल, पर्यटन, पर्यावरण प्रेमी, कायम म्हैसवळण घाट रस्त्याने प्रवास करतात या खड्डेमय म्हैसवळण घाट रस्त्याची अत्यंत दुरवस्था असल्यामुळे या म्हैसवळण घाटात कायम छोटे मोठे जीवघेणे अपघात हे सातत्याने होत असतात या रस्त्याची अत्यंत लाजिरवाणी जीवघेणी खड्डेमय परिस्थिती आहे.

अद्याप देखील नाविलाजास्तव या रस्त्यावरून येथील स्थानिकांना प्रवासी, पर्यटक, व्यापारी, शेतकरी, शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी नोकरदार वर्ग वाहनधारकांना या रस्त्यावरून दररोज जिकिरीचे जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.तसेच अडसरे बु ते भंडारदरावाडी हा अत्यंत महत्वपूर्ण पणाळ रस्ता सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटलेल्या पाझर तलावामुळे पूर्णपणे वाहून गेला अद्यापही त्या रस्त्याची आजपर्यंत कोणतेही दुरुस्ती झालेली नाही तरी हा रस्ता तात्काळ नव्याने करण्यात यावा.म्हैसवळण घाट येथील रस्त्याला अनेक ठिकाणी या रस्त्याच्या कडेला सरंक्षण भिंत कठडे नाहीत तर अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद झाला आहे. तर अनेक ठिकाणी या रस्त्याला अपघात प्रवण क्षेत्र बनलेले आहेत मागील काळात हा टाकेद फाटा ते टाकेद मार्गे म्हैसवळण घाट रस्ता प्रजीमा 27 मध्ये मंजूर होता परंतु अद्यापही मंजूर असतांना या रस्त्याचे कामकाज पूर्ण झाले नाहीत गेल्या चार पाच वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तरी या रस्त्यासंदर्भात अत्यंत दयनीय असलेला अरुंद म्हैसवळण घाट रस्ता रुंद करून तात्काळ नव्याने दुरुस्ती करावा व चांगल्या प्रतीचा टाकेद फाटा ते टाकेद गाव मार्गे म्हैसवळण घाट रस्ता नव्याने बनविण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शेतकरी दौलत बांबळे, दिलीप बांबळे, अशोक गाढवे, किरण साबळे, जालिंदर करवंदे आदींसह या परिसरातील प्रवासी वाहनधारकांनी केली आहे.

“गेल्या अनेक महिन्यांपासून म्हैसवळण घाट रस्त्याची अतिवृष्टीमुळे दयनीय दुरवस्था झाली आहे.खड्डेमय म्हैसवळण घाट रस्ता जीवघेणा झाला असून हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे या रस्त्यांवर सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात,खड्यांमुळे बस सेवा देखील या भागात बंद आहे,यासोबतच अडसरे बु येथील पणाळ रस्ता देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे प्रशासनाने वेळीच लक्ष्य घालून हा रस्ता प्रश्न तात्काळ सोडवावा.
राम शिंदे सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here