एसकेडीच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश

0
1

देवळा : सी.बी.एस.ई. दहावीच्या फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून,भावडे ता देवळा येथील एस के डी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

Karnataka Election Result : कर्नाटक राज्यातील या आहेत टॉप फाइट

दहावीच्या परीक्षेत कुमारी श्रेया संदीप शेवाळकर या विद्यार्थिनीने 96 टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक मिळविला. याचप्रमाणे प्रथम पाच गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे..कुमार आर्यन संजय निकम या विद्यार्थ्याने 91.40 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. कुमारी पायल योगेश देवरे हिने 90.20 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कुमारी सलोनी राजेंद्र हिरे 89.80 तर कुमार निखिल भास्कर बच्छाव 88.20% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे.

एकूणच सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगली टक्केवारी मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय देवरे , सेक्रेटरी मीना देवरे , प्राचार्य सुनील पाटील आदींसह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कौतुक केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here