Women abuse : भेटायला ये नाही तर तुझ्या बापाला…..

0
47

Women Abuse : मला भेटायला ये नाहीतर तुझ्या वडिलांना ठार मारेल अशी इंस्टाग्राम च्या माध्यमातून अल्पवयीन मुलीचा धमकी देणाऱ्या माथेफिरू विरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरांमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्राम instagram वर मेसेज केला यामध्ये त्याने मला भेटायला ये नाहीतर तुझ्या वडिलांना मारून टाकेल मी तुला लग्न करून देणार नाही अशी धमकी दिली होती दरम्यान या प्रकरणी पीडित मुलीच्या व तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी ओंकार मानकर यांच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सेनगाव येथे राहणाऱ्या पिडीतेला तिच्या शहरातील रहिवासी असलेला आरोपी ओंकार हा त्रास देत होता. तो पीडित अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी वारंवार धमकावत होता मात्र पिडीत तरुणी न भेटल्याने गुन्हेगार ओंकार याने तिला इन्स्टाग्राम (instagram) वर भेटायला आली नाही तर तुझी बदनामी करून तुझ्या वडिलांना ठार करेल व तुला कुठेही लग्न करून देणार नाही, मी तुझी हत्या करेल असा धमकी वजा इशारा त्याने लिहिला.

दरम्यान याबाबत पीडित मुले ने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर ओंकार मानकर यांच्या विरुद्ध सेनगाव पोलिसात पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओंकार मानकर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास पोलीस करत आहेत.

 

गेला काही दिवसांपासून राज्यातील महिला व तरुणींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यातच काही दिवसांपासून या प्रमाणात वाढ होत असल्याने राज्यभरातील तरुणी व महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे. दरम्यान एका अल्पवयीन मुलीला एकतर्फी प्रेमातून तिच्या वडिलांना व तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने या प्रकरणामुळे हिंगोली मध्ये खळबळ उडाली आहे तर अशा माते फिरून विरोधात पोलिसांनी कठोर पावल उचलावी अशी देखील मागणी केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here