Congress strike : महागाई, बेरोजगारी,
प्रश्नावर शासन न घेई खबरदारी, कापूस उत्पादक शेतकरी फेरो दारोदारी! मग उपक्रम कसला घेत आहे शासन आपल्या दारी. अशी टीका करत धुळ्यात आज काँग्रेस कमिटीच्या वतीने लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आल आहे. सदर या आंदोलनात केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली आहे.
स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी केला आहे.
वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने केंद्र शासन,राज्य शासन, जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका, व ग्रामपंचायतीमध्ये लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे. त्याच प्रकारे जनजागृती ही करण्याचे काम केले जात आहे. मात्र असे असताना केवळ सरकारी तिजोरीतून पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतःचा पक्ष वाढीसाठी शासन आपल्या दारी! हा उपक्रम राबवला जात असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी केला आहे.
दरम्यान राज्यात महिला अत्याचार वाढती महागाई यांसारखे एक न अनेक प्रश्न उपस्थित असताना शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून सत्ताधाऱ्यांना नेमकं साध्य काय करायचं आहे. असा प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला आज धुळ्यामध्ये शासन आपल्या दारी उपक्रम होत आहे. यासाठी विविध मंत्री उपस्थित आहेत त्यांच्याकडून जिल्ह्यातील ज्वलंत असा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला जावा असे देखील मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी व देशातील जनतेचा भाजपने विश्वासघात केला आहे. देशातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे क्यूमाईन क्लब, जेल समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितल आहे. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाम सनेर – जिल्हाध्यक्ष – काँग्रेस कमिटी – धुळे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम