Maratha Reservation | आज मराठ्यांचे भवितव्य ठरणार; दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू

0
11
Maratha Reservation

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  राजधानी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू आहेत. तर, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या ह्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळवे यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून कडवे प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे आणि शिष्टमंडळाने आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट देखील घेतली होती.

 

दरम्यान, आता छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व लोकसभा तसेच राज्यसभा खासदारांनी दिल्लीत एकत्र यावे यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.  मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बळ मिळावे यासाठी ही बैठक आयोजित केलेली असल्याचा उल्लेख करत त्यांनी सर्व खासदारांना एकत्र येण्याचे आवाहनही केलेले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील लोकसभा व राज्यसभा खासदारांना राजधानीत एकत्र येण्यासाठी पत्रदेखील लिहिलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे राज्यभर सुरु असलेले आंदोलन,  महाराष्ट्र दौरा तसेच मराठा तरुणांच्या आत्महत्यांचा उल्लेख करत मराठा आरक्षणासाठी सर्वांची एकी ही महत्वाची असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Agriculture News | चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; भाजीपाल्यासह द्राक्ष पिकं झोपली

काय म्हणाले संभाजीराजे ? 

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाज हा मागील अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. यासाठी अनेक मोर्चे, आंदोलनं, उपोषणं झालीत. काही युवकांनी यासाठी आत्महत्येचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना ह्या तीव्र असून, तरीही समाजाने आपली मागण्या ह्या शांततेच्या व संविधानिक मार्गानेच पुढे आणलेल्या आहेत. मराठा समाजाच्या ह्या मागणीला प्रतिसाद देत २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने तर, २०१८ मध्ये फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

पण, सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही. मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात सातत्याने जनजागृती करीत आहे. तसेच, मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलेला असून, मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. ते राज्यव्यापी महाराष्ट्र दौरा देखील करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे या आंदोलनात मोठ्या स्वरूपात सहभाग घेत आहेत.

दरम्यान, माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण येत्या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी ह्या नात्याने आवाज उचलणे हे आवश्यक आहे. या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांनी एकत्र येत मराठा आरक्षणाबाबत कठोर भूमिका ठरवण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन केलेले आहे.

Big News | महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपालांचा सल्ला

आज मनोज जरांगेंची सभा

 विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)यांची आज यवतमाळ येथे भव्य सभा आहे. त्यानंतर जरांगेंची पुसदमध्ये ओबीसी नेत्यांसोबत एक बैठक देखील होणार आहे.

मराठा आरक्षणाचं भवितव्य, आज सुनावणी

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या ह्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचे भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण हे वैध की अवैध यावर आज सुनावणी पार पडणार आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पीटिशनवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दुपारी दीडच्या सुमारास ह्या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ५ मे २०२१ रोजी मराठा समाजाचे आरक्षण हे रद्द केले होतं. यावर पुनर्विचार करण्याच्या राज्य सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Breaking News | 48 तासात लहान मुलं अचानक गायब; राज्यात नेमकं चाललंय काय?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here