Skip to content

Agriculture News | चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; भाजीपाल्यासह द्राक्ष पिकं झोपली

framer news

Agriculture News | मिचॉंग चक्रीवादळामुळे राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलं आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून हलका मध्यम स्वरूपाचा या पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदील झाला असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली होताना दिसत आहे. (Agriculture News)

Big News | महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपालांचा सल्ला

अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे उशिरा झालेल्या पेरण्या आणि संभाव्य टंचाईचा परिणाम रासायनिक खताच्या मागणीवरही झाला असताना खरीप आणि रब्बी हंगामात 2020 मध्ये 4.33 लाख मेट्रिक टन खताचा वापर झाला होता. यंदा मात्र या वापरात कमालीची घट होऊन अवघा 1 लाख 2 हजार 930 मेट्रिक टन एवढाच खताचा वापर झाला असून यंदा महिनाभर उशिरा पाऊस दाखल झाल्यामुळे पेरण्याही उशिराच झाल्या, त्यातदेखील विस्कळीत स्वरूपाचे पर्जन्यमान राहिल्याने खताच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. (Agriculture News)

हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला असून या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाला आहे या पावसाचा फटका हरभऱ्याच्या पिकाला सुद्धा बसल्याचे पाहायला मिळते जोरदार स्वरूपाच्या झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणच्या हरभऱ्याला मर रोगाने ग्रासले असताना हरभऱ्याची झाडे आपोआप पिवळी पडून वाळत आहेत.

हेही वाचा : Big News | महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपालांचा सल्ला

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे. नाशिक -छ. संभाजीनगर महामार्गावरील निफाड येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असताना या नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी, पीक विमा कर्ज शेतकऱ्यांचे माफ करावे तसेच वीज बिल माफ करावे, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक-छ. संभाजीनगर महामार्गावरवरील निफाडच्या शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केलेले आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे नाशिक–छ. संभाजीनगर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत केली आहे.(Agriculture News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!