Job Alert | ZP शाळांमध्ये शिक्षकांची भरती सुरु; ईडब्ल्यूएस मधूनही उमेदवारांना संधी

0
26

Job Alert | सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये आता 700 शिक्षकांची भरती होणार आहे. मागासवर्गीय कक्षाकडून जिल्हा परिषद शाळांची बिंदुनामावली अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रियेला वेग आला असून आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर ‘पवित्र’ पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळणार असून अंतिम टप्प्यात मेरिट यादीनुसार ही भरती होणार आहे. (Job Alert)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात दोन हजार 795 शाळा आहेत. या शाळांमध्ये साडेआठ हजारांपर्यंत शिक्षक आहेत मात्र पटसंख्येच्या तुलनेत अद्याप शिक्षकांची संख्या कमीच आहे. जवळपास सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नसल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जास्त आणि शिक्षक कमी अशी स्थिती असताना आता राज्य सरकारने 32 हजार शिक्षक भरती जाहीर केली तसेच सर्व जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाने तपासून अंतिम केली. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 620 पदे तर उर्दु माध्यमांच्या शाळांमध्ये 58 आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्येही जवळपास 30 पदांची भरती होणार आहे.

Agriculture News | चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; भाजीपाल्यासह द्राक्ष पिकं झोपली

आंतरजिल्हा बदलीमुळे परजिल्ह्यातील काही शिक्षक सोलापूर जिल्ह्यात येणार असून त्यामुळे हा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पार पडल्यानंतर उर्वरित जागांवर नवीन शिक्षकांची भरती होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती आणि कोणत्या संवर्गाची पदे रिक्त आहेत ही माहिती आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही. म्हणुन या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. (Job Alert)

कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कार्यवाही सुरू

सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात जिल्हा परिषदेच्या 37  शाळा असून त्यातील महालक्ष्मी नगर आणि सलगरवाडी येथील शाळा पटसंख्येअभावी गतवर्षी बंद पडलेल्या आहेत. आता उर्वरित 35 पैकी कमी पटसंख्या असलेल्या काही शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. पटसंख्या कमी असतानाही त्याठिकाणी जास्त शिक्षक कार्यरत असताना त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळांमध्ये नेमणूक दिली जाणार असल्याचेही सांगितले जाते आहे. (Job Alert)

Big News | महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपालांचा सल्ला

शिक्षकांची भरती (Job Alert)

उर्दु माध्यम रिक्त पदे

  • जात संवर्ग – भरती होणारी पदे (मराठी माध्यम)
  1. एसटी -430
  2. एससी- 52
  3. ओबीसी -42
  4. खुला -34
  5. ईडब्ल्यूएस- 62

एकूण -620

  • जात संवर्ग – भरती होणारी पदे 
  1. एसटी- 18
  2. एससी -05
  3. एनटी-ब -06
  4. एनटी-क -09
  5. एनटी-ड -05
  6. एसबीसी -05
  7. खुला – 10

एकूण – 58


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here