Maratha Reservation | जरांगेंच्या डोक्यावर ‘या’ नेत्याचा ‘वरदहस्त’..?; महिलेचे गंभीर आरोप

0
17
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation |  सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले आहे. एकीकडे याबाबीवरून मंत्र्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात असून, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हे आरक्षण मान्य नसून ते त्यांच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम आहेत. यानंतर काल त्यांनी सरकारला २ दिवसांचा वेळ दिला असून, यानंतर ते त्यांचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितली आहे.

दरम्यान, यातच आता मनोज जरांगे यांच्या गटात फुट पडल्याचे दिसत आहे. काल त्यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्या काही गंभीर आरोप केले होते. यानंतर आता पुन्हा त्यांच्याच सहकारी असलेल्या एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचेच ऐकतात असा गंभीर आरोप मराठा आंदोलन कर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी केला आहे.(Maratha Reservation)

Maratha Reservation | वृद्धांनी आमरण उपोषण करावे आणि जर..; असे होईल पुढील आंदोलन

‘त्या’ नेत्याच्या कार्यकर्त्यांनी लावले जरांगेंचे बॅनर 

दरम्यान, यावेळी संगीता वानखेडे म्हणाल्या की,” जरांगेंना शरद पवार यांचाच फोन येत होता. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं. त्यामुळे आम्ही अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे ज्यांनी बॅनर लावले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी असून, त्यांनी ते बॅनर लावले होते. टोपी घालून मनोज जरांगे अख्खं पुणे शहर फिरले. तर, शरद पवार त्यांना जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील हे करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे शरद पवारच आहेत, असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांच्या सहकारी संगीता वानखेडे यांनी केले आहेत.  (Maratha Reservation)

Maratha Reservation | ठरलं तर..! मराठा समाजाला इतके आरक्षण..?

Maratha Reservation | अंतरवालीमध्ये दंगल घडली की घडवली..?

मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राला वेड बनवत आहेत तिथे अंतरवालीमध्ये दंगल घडली की घडवली गेली होती?, याचा राज्य सरकारने शोध लावाला पाहिजे. आधी मनोज जरांगे कोण आहेत हे मिडीयालाही माहित नव्हतं. मनोज जरांगे हे भोळा भाबडा माणूस, मूळ आहे त्या भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला होता. तर, मनोज जरांगे यांची बाजू घेत मी छगन भुजबळ यांनाही ट्रोल केलं होतं. तेव्हा लोकं मला गलिच्छ भाषेत काहीही  बोलत होते. मात्र, आता संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. आता मी त्यांचा विरोध करतेय, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ते कोणालाही विश्वासात घेत नव्हते.

मी आता एक ते दीड महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचा विरोध करत असून, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसते आहे. मनोज जरांगे हे मध्यंतरी कोणालाही विश्वासात घेत नव्हते. मात्र, केवळ एक फोन ज्याचा येत होता, त्यांनाच जरांगे विश्वासात घेत होते आणि तो फोन हा शरद पवारांचा असल्याचे संगीता वणखेडे यांनी सांगितले आहे. (Maratha Reservation)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here