सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (वय ४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि. २१) रोजी मृत्यू झाला. या घटनेची परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाखारवाडी (ता.देवळा) येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे आपल्या शेतात बुधवार (दि. २१) रोजी जनावरांसाठी मक्याच्या चाऱ्याची कुटी तयार करीत असतांना त्यांना सर्पदंश झाला. यावेळी त्यांना देवळा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.(Deola)
Deola | शिवाजी महाराजांनी मातीसाठी लढणारी माणसे तयार केली – शिवव्याख्याते आशिष पगार.
त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, वाखारवाडी येथे जाधव यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने वाखारवाडी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संदीप चौधरी, बर्डे आदी करीत आहेत.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम