Maratha Reservation | वृद्धांनी आमरण उपोषण करावे आणि जर..; असे होईल पुढील आंदोलन

0
13
Manoj Jarange
Manoj Jarange

Maratha Reservation | मराठा समाजाला काल स्वतंत्र आरक्षण देण्याच्या विधेयकाला मंजूरी मिळाली. यानुसार, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना हे मान्य नसून, त्यांनी सगे सोयऱ्यांची मागणी लाऊन धरली आहे. दरम्यान, आज त्यांनी मराठा आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची घोषणा केली. तसेच आता हे चौथ्या टप्प्यातील आंदोलन कसे असेल? हेदेखील सांगितले आहे.

या आंदोलनाला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार असून, जरांगे यांनी राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी पुढील दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व गावांमध्ये एकाचवेळी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाईल. (Maratha Reservation)

Maratha Reservation | ठरलं तर..! मराठा समाजाला इतके आरक्षण..?

Maratha Reservation | अशी आहे आंदोलनाची पुढील दिशा… 

  • प्रत्येक गावात मराठा समाजाने ‘रस्ता रोको आंदोलन’ करायचे आहे.
  •  मात्र, जाळपोळ करायची नाही. विद्यार्थ्यांच्या १२ वी च्या परीक्षा चालू असल्याने आंदोलन शांततेत करा.
  • सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत आंदोलन करायचे आणि ज्याला या वेळेत आंदोलन करायला जमले नाही. त्याने संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत आंदोलन करावे.
  •  मात्र, यात जर एखाद्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आली तर त्यांना दुचाकीवरुन परीक्षा केंद्रावर सोडा.
  • आणि जर निष्पाप लोकांवर पोलिसांनी केसेस केल्या तर पूर्ण गाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा.
  • सरकारी पदावर असलेल्या आमदार, खासदार, मंत्री यांना आपल्या गावात येऊ देऊ नका.
  • मात्र, निवडणुकीची आचारसंहिता मोडू नका.
  • मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये. आणि जर निवडणूक घेतली तर, प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या गाड्या गावात आल्या तर त्या ताब्यात घ्या.(Maratha Reservation)

Maratha Reservation | मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार..?; पण जरांगे ‘ओबीसी’वरच ठाम

वृद्धांनी आमरण उपोषण करावे आणि जर… 

तसेच यावेळी मराठा समाजाला राज्य सरकारने मराठा समाजाला २९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास राज्यातील मराठा समाजातील वृद्ध लोकांनी आमरण उपोषणाला बसायचे आणि यापैकी एकही व्यक्ती जर मेली तर त्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल. असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला असून, आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे नव्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार यात काहीच शंका नाही. (Maratha Reservation)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here