Maratha Reservation | मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार..?; पण जरांगे ‘ओबीसी’वरच ठाम

0
39
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation |  गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचा आज निकाल लागणार आहे. आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. आज दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार असून, आता सरकार मराठा समाजाला कसा न्याय देतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (Maratha Reservation)

आज मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. काल शिवनेरी येथे झालेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मकता असल्याचे भाष्य केले. त्यामुळे आज हा प्रश्न निकाली लागेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. दारम्यान, यातच आता अधिवेशनापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Maratha Reservation | मनोज जरांगेंचा इशारा.. 

आजचया या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर आगामी काळात भयंकर असे मराठा आंदोलन उभे राहील, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तसेच हे आंदोलन पाहून सरकारला पश्चाताप म्हणजे काय याची व्याख्या काय असते, याची प्रचिती येईल, असे जरांगे म्हणाले आहेत.(Maratha Reservation)

Maratha Reservation | सरकारला मराठ्यांचा धाक; शिवजयंतीबाबत मोठा निर्णय

सरकार काहीतरी दुसरंच करतंय 

तसेच यावेळी त्यांनी कुणबी नोंद असलेल्यांच्या सगेसोयऱ्यांचाही ओबिसीत समावेश झाला नाही तर, विधिमंडळात पारित होऊ घातलेल्या मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा बहुतांश समाजाला फायदा होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मागील पाच ते सहा महिन्यांपासून मराठा समाज हा आरक्षणासाठी झुंजत आहे. आम्ही एक मागणी केली आणि सरकार काहीतरी दुसरंच करतंय. हे आता राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे.

पण या कायद्यातंर्गत मिळालेल्या स्वतंत्र मराठा आरक्षणाचा फायदा हा फक्त १५० ते २०० मराठ्यांनाच मिळणार आहे. आज बाकी करोडो मराठ्यांची मागणी ही ओबीसी प्रवर्गातील आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, अशी आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, अशांसाठी सगेसोयऱ्यांचा कायदा पारित करण्याचा शब्द दिलेला होता. मग आता त्याची अंमलबजावणीही करा. आजच्या या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला तातडीने सगेसोयऱ्यांचा मुद्द्यावर चर्चा करा आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करा. नाहीतर, राज्यभरात मराठा समाजाचे भयंकर आंदोलन उभे राहील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.(Maratha Reservation)

Maratha Reservation | जरांगेंना आंदोलनाची गरज नव्हती; काय म्हणाले मुख्यमंत्री..?

ते दोन-तीन लोक महत्त्वाचे की, हे ६ कोटी मराठे 

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की,”दोन-तीन लोकांना मराठा समाजाचं वाट्टोळं करायचं आहे. याआधी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा समाजाच्या तरुणांच्या निवडी झाल्या. पण त्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या नाहीत. या पोरांच्या हातामध्ये आता पेन हवा होता. मात्र, त्यांच्या हातात आज आंदोलनाचं हत्यार आहे. त्यांचं वय निघून चाललंय.(Maratha Reservation)

आताही पारित करण्यात आलेलं मराठा आरक्षण टिकलं नाही तर पुढेही तेच होणार. त्यापेक्षा आम्हाला ओबीसी प्रवर्गातीलच असणारं आमचं हक्काचं आरक्षण देण्यात यावं. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत. त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे यांनी अधोरेखित केली. स्वतंत्र आरक्षण हे मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला ते दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की, हा ६ कोटी मराठा समाज महत्त्वाचा आहेत, असा सवालही यावेळी त्यांनी केला.(Maratha Reservation)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here