Maratha Reservation | जरांगेंना आंदोलनाची गरज नव्हती; काय म्हणाले मुख्यमंत्री..?

0
69
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation |  मराठा आंदोलक मनोज जरांगे हे १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसले असून, कालपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. सगे-सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली जावी यासाठी ते उपोषण करत आहेत. दरम्यान, याबाबत आज सकाळी ९ वाजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली असून, यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारसमोर सादर करण्यात आला. (Maratha Reservation)

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळेल, असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य सरकार आधीपासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक होतं. त्यामुळे मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची गरज नव्हती. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आरक्षण मागे घ्यावं, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या बैठकीस अनुपस्थित होते.

Dada Bhuse | मंत्री दादा भूसेंनी मांडला राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अहवाल

Maratha Reservation |काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी साडेतीन ते चार लाख लोक युद्ध पातळीवर काम सुरू होते. यासाठी सव्वादोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तर, २० तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनातही याबाबत चर्चा होणार आहे.(Maratha Reservation)

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं व टिकणारं आरक्षण दिलं जाईल. तसेच ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर कुठलाही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका ही पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट व सकारात्मक असल्यामुळे मराठा समाजाने कुठलेही आंदोलन करण्याची गरज नव्हती. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना केलं. त्याचवेळी कुणबी नोंदी असलेल्या लोकांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Maratha Reservation | आता मराठ्यांनी ‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं…

अहवाल मराठा समाजाच्या बाजूने

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा मराठा समाजाच्या बाजूने असून, या अहवालात मराठा समाज हा मागास असल्याचे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. आज हा अहवाल सरकारसमोर सादर करण्यात आला असून, २० फेब्रुवारीला शिंदे सरकारने मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, यावेळी मराठा आरक्षणाविषयी स्वतंत्र कायदा केला जाण्याची शक्यता आहे. (Maratha Reservation)

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here