Manoj Jarange | मनोज जरांगे राजकारणात येणार; आज समाजासमोर भूमिका मांडणार..?

0
36
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange |  आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती व्यतिरिक्त आता तिसऱ्या संघटनेची चर्चा सुरु आहे आणि ती ‘मराठा समाज’ काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यस्तरीय मराठा समाजाच्या बैठकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रत्येक जिल्ह्यातून एक मराठा समाजाचा उमेदवार देण्यास आणि त्या उमेदवाराला मराठा समाजाने निवडून देण्याचे आवाहन केले.(Manoj Jarange)

दरम्यान, यातच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आणि या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना वंचितला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली. मराठा आंदोलनानंतर मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांना मराठा समाज आणि प्रकाश आंबेडकर यांनीही केला होता. तर, मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत मराठा समाजात रोष असून, याचा परिणाम राजकीय पक्षांच्या मतांवरही होणार असल्याचे स्पष्ट आहे.(Manoj Jarange)

Manoj Jarange | जरांगेंनी बोलावली बैठक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेणार

आधी लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याबाबत निर्णय झाला. तर, यानंतर अंतरवाली सराटीत येथे राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. आज या सर्व बैठकांचा आढावा घेऊन मनोज जरांगे निर्णय जाहीर करणार आहे. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील काय घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

निवडणूक लढवणार नाही, राजकारणात येणार नाही 

काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अंतरवाली येथे मनोज जरांगेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी वंचितच्या काही उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंच्या साथीने पुढे जाणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. तर जरांगेंना राजकारणात उतरण्याचा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला. मात्र आधीपासूनच कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा तसेच सक्रिय राजकारणात न येण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केलेला आहे.(Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांची भेट; अन् जरांगेंनी केली मोठी घोषणा

Manoj Jarange | आज जरांगे निर्णय जाहीर करणार 

दरम्यान, सामाजिक आंदोलनाचं अंग हे वेगळं असतं. तर राजकारण हे पूर्णपणे वेगळं असतं. समाजकारण करताना एकमताला जास्त किंमत असते. तर राजकारणात बहुमताची अधिक गरज असते, असंही त्यांनी सांगितले. तर, आंबेडकरांसोबतच्या युतीवर आज मनोज जरांगे पाटील हे आपला निर्णय सांगणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन ते आपली पुढील भूमिका जाहीर करतील. (Manoj Jarange)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here