Manoj Jarange | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोज जरांगेंना आवाहन

0
21
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange |  एकीकडे आज संपूर्ण देश ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होता. तो सोहळा अयोध्येत पार पडत आहे. तर, दुसरीकडे मात्र मराठा नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज हा २० तारखेपासून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. २६ जानेवारी रोजी ते लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निगलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन थांबवण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यावेळी ते म्हणाले की,”मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून युद्धपातळीवर डाटा संकलन देखील सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात येणार” असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.(Manoj Jarange)

Manoj Jarange | मराठ्यांसमोर सरकार बिथरले..?

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा बांधव यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. यापुढेही त्यांच्या या पायी दिंडीत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आंदोलनाकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. काल मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आले असता, त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले.(Manoj Jarange)

Manoj Jarange | एकही मराठा उपाशी जाता कामा नये; ६ लाख भाकरी, ३०० क्विंटल भाजी

Manoj Jarange | काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..?

यावेळी ते म्हणाले की,”मराठा आरक्षणासाठी आमचे सरकार सकारात्मक असून आम्हाला कायद्याच्या कक्षेत टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देतानाच ओबीसी आणि इतर कुठल्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मनोज जरांगेंनी आणि मराठा आंदोलकांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे,’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.(Manoj Jarange)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here