Ram Mandir | प्राण प्रतिष्ठेपूर्वी मोठी बातमी..! श्रीरामांच्या शोभा यात्रेवर दगडफेक

0
6
Ram Mandir
Ram Mandir

Ram Mandir |  आज अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत आहेत. यासाठी देशभरातून दिग्गज मंडळी आज या ठिकाणी दाखल झाले आहे. थोड्याच वेळात याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होणार आहे. तसेच या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल. कालपासूनच संपूर्ण देशभरात कार्यक्रमाची सुरुवात झाली देशभरात भक्तिमय वातावरण पसरले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Ram Mandir | अयोध्येत आज ‘असे’ असणार कार्यक्रम आणि पूजाविधी

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात प्रभू श्री रामांच्या या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी गुजरात पोलिसांनी येथे जमलेल्या लोकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी मेहसाणा जिल्ह्यातील खेरुला शहरात ही संतापजनक घटना घडली आहे. इंडिया टुडेने पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त दिलेलं असून, यानुसार येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या काही नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. पोलीस अधीक्षक विरेंद्रसिंह यादव यांनी या घटनेची माहिती दिली.(Ram Mandir)

Ram Mandir | तातडीने पाऊले उचलल्याने परिस्थिती नियंत्रणात

दरम्यान, अयोध्येत होत असलेल्या या दिमाखदार सोहळ्याच्या आधी ही धक्कादायक घटना घडल्यामुळे येथे राम भक्तांच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. तर,पोलिसांनी येथे करण्यात आलेल्या कोंबिग ऑपरेशनच्या वेळी १५ जणांना ताब्यात घेतलं होतं. या घटनेनंतर येथील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी शोभा यात्रेसोबत असलेल्या पोलिसांनी लगेच ठोस पाऊले उचचली.

Ram Mandir | अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज ‘या’ कंपन्यांचे शेअर्स तेजीत

त्यामुळे तातडीने येथील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली, असं पोलीस अधीक्षक विरेंद्रसिंह यादव यांनी सांगितलं आहे. दरम्यान, दगडफेकीच्या या घटनेत शोभायात्रेत सहभागी कोणीही काही गंभीर जखमी झालेलं नसून, घटनास्थळी आता एकूण परिस्थिती ही नियंत्रणात आहे. मात्र, पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.(Ram Mandir)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here