Manoj Jarange | एकही मराठा उपाशी जाता कामा नये; ६ लाख भाकरी, ३०० क्विंटल भाजी

0
22
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange |  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे. या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले आहे. जरांगेंनी सरकारला दिलेला ‘अल्टीमेटम’ संपला असून, आरक्षणाचा लढा आता मुंबईत उभारण्यासाठी आज मनोज जरांगे सकल मराठा समजासह मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. दरम्यान, हा पायी प्रवास करत २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे हे मुंबईत पोहचतील.(Manoj Jarange)

मराठ्यांची ही दिंडी आता ६ दिवस सुरू असणार आहे. दरम्यान, पुढे जाताना या दिंडीत मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव हे सहभागी होणार आहेत. हे सहा दिवस जरांगे आणि आंदोलकांचा मुक्काम कुठे कुठे असणार आहे. याबाबतचे नियोजन आधीच जाहीर करण्यात आले होते. आजचा पहिला मुक्काम हा जरांगेंच्या गावी मातोरी येथे होणार आहे. यासाठी मातोरी गावातील गावकऱ्यांनी या दिंडीत सहभागी असलेल्या मराठा आंदोलकांच्या जेवणाची आणि  राहण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी गावात तब्बल ३०० एकरावर मंडप टाकण्यात आल आहे. तर, जेवणासाठी २०० पोती बुंदी ६ लाख भाकरी आणि तीनशे क्विंटल भाजी अशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

Manoj Jarange | ….अन् मराठ्यांच्या सेनापतीला अश्रु अनावर

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी याआधीही जरांगे यांनी उपोषण केले होते. मात्र, ते अंतरवाली सराटी येथे केले होते. तसेच, त्यावेळी मराठा समाजाने येऊ नये. असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, यावेळी थेट मुंबईत उपोषण करणार आहे. यासाठी मुंबईपर्यंत पायी जाणार असून, राज्यभरातील मराठा समाजाने उपोषणस्थळी येण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. याद्वारे मराठा समाजाचे शक्तिप्रदर्शन हा उद्देश्य असल्याचेही सांगितले जात आहे.

आज आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने पायी दिंडी काढली आहे. दरम्यान, आज मराठ्यांच्या या दिंडीचा पहिला मुक्काम जरांगे यांचे जन्मगाव असलेल्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या गावात होणार आहे. त्यामुळे या दिंडीतील आंदोलकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था शिरूर, पाटोदा, आणि आष्टी तालुक्यातील मराठा समाजबांधवांकडे असणार आहे.(Manoj Jarange)

Maratha Breaking | जरांगे-सरकारमधील ताण वाढणार? जरांगे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना

ग्रामस्थांनी मोठी तयारी केली असून, जेवणासाठी दोनशे पोती बूंदी, सहा लाख भाकरी, तीनशे क्विंटलची भाजी तयार केली जात आहे. यासोबतच, पिण्याच्या पाण्याचे शंभर टँकर, दोन लाख पाण्याच्या बाटल्या आणि अंघोळीसाठी गरम पाण्याचीही व्यवस्था केली आहे. तर, आंदोलकांसाठी ३०० एकरांवर मंडप व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Manoj Jarange | एकही मराठा मावळा उपाशी जाता कामा नये

मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीसाठी कोळगाव येथे तब्बल ७० क्विंटल इतक्या खिचडी तयार करण्यात येत आहे. “एकही मराठा मावळा हा उपाशी जाणार नाही”, इतके तगडे नियोजन या मराठा बांधवांकडून करण्यात आलेले आहे. आज मनोज जरांगे हे आंतरवाली येथून मुंबईकडे निघाले असून, त्यांचे दुपारचे जेवण हे गेवराईच्या कोळगावमध्ये होणार होते. त्याकरिता कोळगाव येथील गावकऱ्यांनी जवळपास ७० क्विंटल खिचडी, २० क्विंटल उपमा, पुरी-भाजी, आणि बाजरीच्या भाकरीचे नियोजन केलेले आहेत. दरम्यान, या दिंडीत सामील होणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच असून, ३० हजारांपेक्षा जास्त मराठा आंदोलक हे एकट्या लातूर जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Manoj Jarange)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here