Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मुख्यमंत्री करा…!

0
12
जरांगे इशारा सभा
जरांगे इशारा सभा

Manoj Jarange | सध्या संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्दा हा गाजताना दिसत आहे. त्यातच राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील चांगलेच चर्चेत आले आहे. मराठा आरक्षणावरुन त्यांनी दोन वेळा उपोषणही केले आणि त्यानंतर मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची केलेली मागणी लावून धरली असताना यामुळे राज्यभरात मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. मात्र त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली असताना मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी समाज नाराज आणि दिले नाही तर मराठा नाराज अशी परिस्थिती आहे. (Manoj Jarange)

या प्रश्नावर संभाजीनगरमधील रिक्षा चालक विशाल नंदरकर यांनी तोडगा काढला असून ३८ वर्षीय नंदरकर यांनी एका स्टँपपेपरवर आपली मागणी लिहिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केलेली आहे.

HDFC Scholarship | पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी HDFC बँक देतेय शिष्यवृत्ती

मनोज जरांगे यांना का करावे मुख्यमंत्री?

शिवबा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी नायक चित्रपटाप्रमाणे मुख्यमंत्री करा त्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा विषय सुटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री केले तर त्यांच्याकडे फक्त मराठा आरक्षण हा विषय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्री राहणार असून ज्या प्रमाणे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे असे दोन जण मुख्यमंत्री म्हणून राहणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहे आणि यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. (Manoj Jarange)

HDFC Scholarship | पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी HDFC बँक देतेय शिष्यवृत्ती

सर्व पक्षांशी चर्चा करुन घ्यावा निर्णय

विशाल नंदरकर यांनी म्हटले आहे की, राज्यातील सर्व पक्षांशी चर्चा करुन दुसरा मुख्यमंत्री नेमयला हवा. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करताना मराठा, धनगर, मुस्लिम आणि ओबीसी हे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे काम दिले गेले पाहिजे. मनोज जरांगे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ऐकतात आणि त्यामुळे मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांची चांगली मदत होऊ शकते. नंदरकर यांनी हे निवेदन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. (Manoj Jarange)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here