Beed voilence| बीडमध्ये महाराष्ट्राचा मणिपूर..? माणिपूरच्या ‘त्या’ घटनेचा रिमेक…

0
31

Beed voilence| बीडमध्ये घडलेल्या ‘त्या’ प्रकरणाची महिला आयोगाने दखलघेतली असून, पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देशही दिले आहेत. जमिनीच्या वादातून एका महिलेची विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना बीडमध्ये घडली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वाळुंज या गावात ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मात्र बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. याप्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस व त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह आणखी तीन जणांवर विनयभंग तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, बीडमध्ये घडलेल्या ह्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. या घटनेत रघु पवार, राहुल जगदाळे, प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, याची माहिती रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी लवकरात लवकर पुढील कारवाई करा व पीडित महिलेला न्याय द्या, असेही रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ह्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Weather Update| शेतकऱ्यांनो..! रहा निश्चिंत..चक्रीवादळामुळे राज्यात अवकळी पाऊस नाही…

ट्विटमध्ये पुढे त्या म्हणतात की “बीडमध्ये जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग करण्यात आला व तसेच निर्वस्त्र करत धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घटना कळताच मी स्वतः बीडचे पोलीस अधिक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती घेतली. अतिशय संतापजनक अशा ह्या घटनेत रघु पवार, राहुल जगदाळे, प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. महिलेला न्याय मिळेपर्यंत आयोग ह्या घटनेचा पाठपुरावा करेल. असे लिहित रूपाली चाकणकर यांनी ही पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील टॅग केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यात जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेतील पीडित महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून वाळुंज येथील त्यांची जमीन कसत आहेत. मात्र, राहुल आणि रघु हे एक दिवस माझ्या जवळ आले व  त्यांनी मला खड्ड्यात पाडले. त्या दोघांनी माझ्यावर त्यावेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आणि यावेळी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यादेखील तिथे उपस्थित होत्या. अगदी हाकेच्या अंतरावर उभ्या असलेल्या प्राजक्ता धस ह्या त्या दोघांना मला मारण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. तसेच, “आमच्या शेतात येते ही पारधी”, असे प्राजक्ता म्हणाल्या असल्याचा आरोपही यावेळी पीडित महिलेने केला.

Lalit Patil case| पोलिसांनी ललित पाटीलला आणलं गुप्तपणे नाशिकला..? नेमकं प्रकरण काय..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here