Skip to content

माळवाडी येथील महात्मा फुले कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ ” रक्तदान शिबिर संयोजक “पुरस्काराने सन्मानित


देवळा : तालुक्यातील माळवाडी येथील महात्मा फुले कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळाला नुकताच शासनाच्या आरोग्य विभागाकडून नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात ” रक्तदान शिबिर संयोजक ” म्हणून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश शिंदे(पोलीस आयुक्त नाशिक.),डॉ. कपिल आहेर (आरोग्य उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक.),डॉ. अशोक थोरात (सिव्हिल सर्जन नाशिक.) उपस्थित होते .

Breaking news : नाशिकच्या त्या लाचखोर शिक्षण अधिकाऱ्याच्या बेहिशोबी मालमत्तेची कसून चौकशी होणार
यावेळी मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बागुल, बापूसाहेब बच्छाव- उपाध्यक्ष, जयराम सोनवणे- सचिव , सुरेश शेवाळे – सदस्य , पंकज बागुल- सदस्य यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

देवळा /माळवाडी येथील महात्मा फुले कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळाला प्रथम पुरस्काराने सन्मानित करतांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे समवेत डॉ. कपिल आहेर,,डॉ. अशोक थोरात व मंडळाचे पदाधिकारी आदी ( छाया – सोमनाथ जगताप )

नाशिक जिल्ह्यातून ग्रामीण भागातून” रक्तदान शिबिरआयोजनात ” माळवाडी आणि फुलेमाळवाडी गावातील क्रीडा मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला. मंडळाच्या वतीने दरवर्षी 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले पुण्यतिथी निमित्ताने गावांतील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ठ शेतकरी, उत्कृष्ट कामगार आदींना सन्मानित करण्यात येते. मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!