नाशिक Malegaon sabha: राज्यातील बंडाळी नंतर सत्ता परिवर्तन झाले. शिवसनेते उभी फुट पडून ठाकरे सरकार कोसळून शिंदे सरकार अस्तित्वात आले. यानंतर ठाकरे शिंदे यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला. शिंदेंच्या मदतीला भाजपा, मनसे तर ठाकरेंच्या मदतीला कॉग्रेस, राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. ठाकरेंना पाऊतयार झाल्याचे शल्य आहे. यामुळे ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांना पराभवाची धूळ चारण्याचा चंग बांधला आहे. याचाच परिपाक म्हणुन ठाकरेंनी खेड येथे रामदास कदम यांच्या होम ग्राऊंड वर जाऊन सभा घेतली. त्यानंतर दादाजी भुसे यांच्या मतदार संघात अद्वय हिरे यांचा प्रवेश घडवून आणला आणि महिन्या भरात सभा घेतली.
ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमविण्यात यश आले. मात्र या सभेला भुसे यांना अंगावर घेण्याची हिमत्त मात्र झाली नाही, कि भुसे यांच्यावर असलेले प्रेम ठाकरेंच्या बोलण्यात आडवे आले. भविष्यात भुसे यांना परतीचा दोर कायम आहे का ? अशी कुजबूज मात्र सभा स्थळी मोठ्या प्रमाणात सुरू होती. सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला अंगावर घेतले , सत्तार यांना डिवचले, कांदे यांना टोला लगावला मात्र ज्यांच्या मतदार संघात आले त्या दादाजी भुसे यांच्या बद्दल मात्र चकार शब्द देखील काढला नाही. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सभेपूर्वी गिरणा शेअर प्रकरणी संजय राऊत यांनी आरोपांच्या फैरी झाडत मालेगावचे राजकारण तापवून दिले. या आरोपांना भुसे यांनी थेट विधानसभेत उत्तर देत, आरोप सिद्ध झाले. तर राजकारण सोडेल असा गर्भित इशारा देत राऊत यांना महागद्दार म्हणत खडसावले. यामुळे मालेगावची सभा आक्रमक होईल. अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती शिवसैनिकांचा मात्र भ्रमनिराश झाल्याचे जाणवले. (Malegaon sabha)
Malegaon Politics: जनतेच्या हृदयातील योद्ध्याला हरविण्यासाठी पाच जिल्ह्यातील गर्दी कशासाठी ?
सभेत गर्दी जमविण्यासाठी मुंबई पासून शिवसैनिकांना आणण्यात आले होते. गर्दी महाराष्ट्रातून जमवली मात्र सभेत फारसा काही प्रभाव ठाकरेंना पाडता आला नाही. ठाकरे बोलतांना म्हणाले कि सर्व सत्तेच्या बाजूला जातात. मात्र अद्वय सारखा मर्द माणूस संकटाच्या काळात आपल्या सोबत आहे, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांदे यांना वगळता ठाकरे यांनी मात्र फारसे कुणाला अंगावर घेतले नाही. यामुळे सोशल मिडियात भूसे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात राळ उठवली असून मालेगावचे नाराज नाराजच असतील ज्यासाठी अट्टाहास केला, ते झालीच नाही. असे म्हणत अद्वय हिरे यांना डिवचले आहे. ( Malegaon sabha)
लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र
सावरकर आमचे दैवत असून एकत्रित लढायचे असेल तर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. या शब्दांत ठाकरे यांनी राहूल गांधींना फटकारले. चाफेकर बंधूंना फाशी दिल्यावर १५ व्या वर्षी अष्टभुजेपुढे शपथ घेणारे सावरकर आमच्यासाठी दैवत आहे. १४ वर्षे मरणयातना भोगणे येड्यागबाळ्याचे काम नाही. २०२४ मध्ये पुन्हा भाजप केंद्रात बसली तर देशातली लोकशाही संपली म्हणून समजा. तेव्हा कुठलीही चूक करू नका, असा सल्ला देखील ठाकरे यांनी गांधीना दिला. ही लढाई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी नसून देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही टिकविण्यासाठी आहे. असा इशारा उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना दिला.
बावनकुळेंना टोला
भाजपा शिवसेनेतील शाब्दिक युद्ध मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. भाजपचे मा. प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील म्हणाले होते की, मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले या वाक्याचा धागा पकडत ठाकरे यांनी टोला लगावला. ठाकरे म्हणाले आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात आम्ही मिंधे गटाला ४८ जागाच देणार. बावनकुळेंनी नावाप्रमाणे तरी जागा द्यावी असा हल्ला ठाकरे यांनी केला. पुढे बोलतांना म्हणाले कि भाजपने जाहीर करावे ते मिंधेना नेते म्हणून निवडणूक लढणार का? तुमची ५२ काय १५२ कुळे आली तरी तुम्ही ठाकरेंना हरवू शकत नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणूक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो, निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा, असे आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम