Mahayuti | लाडकी बहीण योजनेचा इमपॅक्ट; १७७ जागांवर महायुतीसाठी अनुकूल परिस्थिती

0
46
Rajyasabha Eelection
Rajyasabha Eelection

Mahayuti | मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, दिवाळीनंतर विधानसभेचे बिगुल वाजण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षांनी आपले विधानसभानिहाय सर्व्हे सुरू केले असून, अनुकूल वातावरण असलेल्या मतदार संघांचा शोध घेतला जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा सर्व्हे हा शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी चांगलाच धोक्याचा ठरला होता. या कथित सर्व्हेमुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला अनेक जागांवर पाणी सोडावे लागले होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024)तोंडावर आता शिंदे गटानेही सर्व्हे केला असून, यात राज्यातील १७७ जागांवरील वातावरण हे महायुतीसाठी अनुकूल असल्याची माहिती आहे.

महायुतीचा प्लॅन सक्सेसफुल्ल..! योजना पावली 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. 48 पैकी केवळ 17 जागा महायुतीला मिळवता आल्या होत्या. यामध्ये भाजपने 9, शिंदे गटाने 7 तर अजित पवार गटाने अवघ्या १ जागेवर विजय मिळवला होता. त्यामुळे महायुतीसाठी विधानसभा निवडणूक ही चांगलीच कसोटीची असल्याचे दिसत असतानाच महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा मास्टर स्ट्रोक टाकला असून, ही योजना महायुतीसाठी किती फलदायी ठरते हे पहावे लागणार आहे. तर, या नव्या सर्वेमुळे महायुतीच्या पक्षांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर, महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनांचा इफेक्ट शिंदे गटाच्या या अंतर्गत सर्वेमध्ये दिसून आल्याची चर्चा आहे.

Mahayuti | विधानसभेसाठी भाजपकडून शिंदे-पवार-ठाकरेंना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा नाही..?

Mahayuti | सर्व पक्षांचे दौरे अन् बैठका 

आगामी निवडणुका येत्या दोन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने आता या काळवढीतील एक एक दिवस हा सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, अजित पवारांची जनसन्मान यात्रा, शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा, ठाकरे गटाचा भगवा सप्ताह.

यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही 10 ऑगस्टपासून विभागनिहाय आढावा सुरू झाला आहे. 10 ऑगस्टला कोकण, 11 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र, 12 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक, 13 ऑगस्टला विदर्भ आणि 14 ऑगस्टला ठाणे आणि पालघर असा हा त्यांचा धावता दौरा असून, यात ते विभागनिहाय विधानसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहे.

Mahayuti | नाशिकच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत आणखी एका महंतांची उडी

महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान 

दरम्यान, या निवडणुकीत एकाच पक्षाचे दोन भाग झाले असल्याने एकाच पक्षाचे नेते एकमेकांविरोधात उभे असल्याची वस्तुस्थिती आहे. पक्ष वाढल्याने आपसूकच पक्षांतील इच्छुकांची गर्दीही वाढली आहे. त्यामुळे अनेक मतदार संघांमध्ये महायुती आणि मविआच्या घटक पक्षांमध्येही उमेदवारीवरुन जुंपली आहे.

दिंडोरी मतदार संघात अजित पवारांचा आमदार असून, शिंदे गटाचे नेते इच्छुक आहेत. तर, नाशिक पश्चिम, मध्य मध्ये ठाकरे गट इच्छुक असून, त्यांना कॉंग्रेस आणि शरद पवार गटाचा विरोध आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्याचे मोठे आव्हान या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर असून, यासाठी त्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here