सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मेशी (ता.देवळा) येथील अपूर्ण अस्वस्थेत असलेल्या महादेव मंदिर सभामंडपाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने गुरुवारी स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी माजी सैनिक प्रविण बोरसे हे मेशीत जगदंबा माता चौकात तिरंग्याजवळ आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहिती बोरसे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. याबाबत बोरसे यांनी तसेच ग्रामपंचायतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना लेखी स्वरूपात कळविले आहे.
सभामंडपाच्या कामाला होणाऱ्या दिरंगाई बाबत संबंधितांना वेळोवेळी कल्पना दिल्यावरही ते काम अद्याप पूर्ण होत नाही व त्यासाठी चक्क माजी सैनिकावर आलेली आमरण उपोषणाची वेळ यामुळे बांधकाम खात्याच्या या गलथान कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मेशी (ता.देवळा) येथे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून सभामंडपाच्या कामाला निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाला संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई तसेच निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे व तेही अपूर्ण अवस्थेत असल्याने गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Deola | माळवाडी येथील महात्मा फुले क्रीडा मंडळाचा जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सन्मान
या विकास कामाबाबत बोरसे यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती करून दिल्यावरही ठेकेदाराकडून काम अद्याप पूर्ण झाले नाही. जे झाले आहे ते पण निकृष्ठ दर्जाचे झाल्याने गावांत नाराजीचा सूर उमटला आहे. याबाबत येत्या दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेवटी माजी सैनिक प्रवीण बोरसे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
मेशी येथील सभामंडपाचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण झाले असून, उर्वरित अपूर्ण काम सुरू आहे – विजय काळे (कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवळा)
Deola | वडाळे जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना राजेंद्र केदारे यांच्याकडून शालेय साहित्याचे वाटप
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम