Mahayuti | विधानसभेसाठी भाजपकडून शिंदे-पवार-ठाकरेंना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा नाही..?

0
15
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

मुंबई:  लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसत नाही की तोच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, येत्या ३ ते ४ महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये जागावाटपाचीही चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. यातच आता महायुतीत जगावाटपाची संभाव्य आकडेवारी समोर आली असून, शिंदे गट १००, अजित पवार गट ९० जागांसाठी आग्रही असून, अशातच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Aathawale) हेदेखील १० जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti Seat Sharing) बिनशर्त पाठिंबा देणारे आणि विधानसभेला २५० जागांसाठी तयारी करायला सांगणारे राज ठाकरे यांनीही २० जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर भाजपची १५५ जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. सर्व पक्षांकडून आपली इच्छा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत भाजपकडून कुठलाही आकडा समोर आला नव्हता. यानंतर पहिल्यांदाच भाजपची संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.

Mahayuti | नाशिकच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत आणखी एका महंतांची उडी

Mahayuti | कोणत्या पक्षाला किती जागा..?

सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने विधानसभा निवडणुकीत १५५ विधासभा मतदारसंघांसाठी तयारी सुरू केली असून, शिंदे गटाची १०० जागांची मागणी असून, त्यापैकी ६० ते ६५ जागा शिंदे गटाला आणि अजित पवार गटाची ९० जागांची मागणी असून, त्यापैकी ५० ते ५५ या दोन्ही पक्षांना देण्याची तयारी भाजपने दाखवली असल्याचे समजते. तर महायुतीतील अन्य तीन मित्रपक्षांसाठीही १५ जागा देण्यासाठी भाजप सकारात्मक असून, आता जागावाटपाच्या चर्चेत रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय मागणी करतील आणि भाजप यासाठी तयार होईल का..? हे पहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातील जनेतेने फारकाही पसंती दर्शविली नाही. तर, केवळ १७ जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले. तर मविआने आघाडी घेत तब्बल ३० जागांवर विजय मिळवला. तर, २३ जागा लढवून भाजपने केवळ ९ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचे या विधानसभा निवडणुकीसाठी कोणती नवी योजना असेल हे पहावे लगणार आहे.

Mahayuti | रात्री शिंदे गटाच्या ‘हाय वोल्टेज’ बैठकीत काय घडलं..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here