Mahayuti Sarkar | राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांची धूम सुरू असून, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा मात्र सुटण्याचे नाव घेत नाही. काल अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा होता. यानंतर त्यांनी रात्री मुंबईत याबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा वाद मिटेल अशी शक्यता होती. तर, यानंतर भाजप महाराष्ट्रात ३२ जागांवर ठाम असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, याउलट हा वाद आणखीच चिघळला असून, आता यात मंत्री छगन भुजबळांनी देखील उडी घेतली आहे. (Mahayuti Sarkar)
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जितक्या जागा दिल्या जातील, तितक्याच जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मिळायला हव्यात, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची जागावाटपाबाबत बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषद घेत भुजबळांनी हे वक्तव्य केले असून, यामुळे जागा वाटपावरून महायुतीत बिनसले असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. (Mahayuti Sarkar)
PM Narendra Modi | उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार?; बड्या नेत्याचा दुजोरा…
Mahayuti Sarkar | नेमके काय म्हणाले छगन भुजबळ?
तर, यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,”लोकसभेच्या जागावाटपावरून अजूनही चर्चा सुरु आहेत. तरी जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यावरच आम्ही आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत. आमच्या डोळ्यांसमोर काही उमेदवार आहेतच, मात्र जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर आम्हाला अधिक जोमाने कामाला सुरुवात करता येईल. पण आम्ही बैठकीत एवढंच सांगितलेलं आहे की, जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील, तितक्याच जागा ह्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील मिळाल्याच पाहिजे, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.(Mahayuti Sarkar)
शेवटी सगळी मंडळी एकत्रित बसून जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जी आश्वासनं दिली आहेत ती पाळली जातील. कालपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या चर्चेत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय लवकरच घेतला जाईल. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, यात काहीच शंका नाही. सामोपचाराने सर्व निर्णय होतील. जागावाटपाबाबत राष्ट्रवादी पक्ष नाराज असल्याच्या चर्चा या तथ्यहीन असून, आताच चर्चा सुरु झाल्या आहेत. आम्ही आधीच कसे नाराज होऊ? राष्ट्रवादीची ताकद ही जास्त आहे. जी जागा आम्हाला मिळेल, आम्ही तिथून जिंकून येऊ, असा विश्वास देखील यावेळी छगन भुजबळांनी व्यक्त केला.(Mahayuti Sarkar)
BJP Lok Sabha | भाजपची रणनीती ठरली; कोणत्या जागेवर कोणता उमेदवार..?
असे होऊ शकते जागावाटप..?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात ४८ पैकी २५ जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेला २३ जागा मिळाल्या होत्या. तर, त्यावेळी भाजपने २५ पैकी २३ जागा जिंकल्या, तर शिवसेनेने २३ पैकी १८. या १८ खासदारांपैकी पैकी १३ खासदार हे सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंसोबत आहेत. दरम्यान, यावेळी भाजपची ताकद वाढली असल्यामुळे भाजप आता ३० ते ३२ जागांवर अडून असल्याचे सांगितले जात आहे. तर, शिंदेसेनेला यावेळीही २२ जागा हव्या आहेत. मात्र, भाजपकडून दबाव टाकला जात असून, एकनाथ शिंदे हे त्यांच्या गटाच्या निवडून आलेल्या १३ जागांसाठी आग्रही होते.(Mahayuti Sarkar)
मात्र, अमित शहा यांनी त्यांना प्रत्येक मतदारसंघाची ग्राऊण्ड रिअॅलिटी समजावून सांगितल्यानंतर आता यापैकी काही विद्यमान खासदारांची तिकिटं कापली जाऊ शकतात. तर, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने केवळ चार जागा जिंकल्या असून, यापैकी केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवारांसोबत आहेत. तर, अजित पवार गट हा किमान दहा जागांसाठी आग्रही असून, भाजपला ३२ जागा हव्या आहेत. त्यामुळे बाकी १६ जागांचे समान वाटप झाल्यास शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी ८-८ जागा मिळण्याची शक्यता आहे. (Mahayuti Sarkar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम