Mahavitaran | ५७० रुपयाच्या बिलासाठी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या

0
29
Mahavitaran
Mahavitaran

Mahavitaran | वीजबिल जास्त आल्यामुळे अनेकदा सामान्य व्यक्तींना यामुळे मनस्ताप होतो. दरम्यान, हेच वीजबिल जास्त आल्यामुळे एका व्यक्तीने थेट एका महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून संपवल्याची घटना समोर आली आहे. बारामती येथील मोरगाव येथे ही घटना घडली असून, 570 रुपयाच्या बिलासाठी  या विकृत मानसिकतेच्या तरुणाने या महिला कर्मचाऱ्याची हत्या केली आहे. मुळच्या लातूर शहरातील रिंकू गोविंदराव बनसोडे ह्या गेल्या दहा वर्षापासून महावितरणमध्ये मोरगाव येथेच कार्यरत आहे. आपली दहा दिवसांची सुट्टी संपल्यानंतर त्या नुकत्याच मोरगाव येथील त्यांच्या कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या. (Mahavitaran)

Nashik Crime | नाशिकच्या सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल

Mahavitaran | नेमकं प्रकरण काय? 

बुधवार रोजी 24 एप्रिल रोजी सकाळी 11.15 वाजता रिंकू बनसोडे या महावितरणच्या मोरेगाव येथील कार्यालयात  एकट्याच होत्या. यावेळी पूर्ण तयारी करून हल्ला करण्यासाठी आलेला आरोपी अभिजीत पोटे याने मृत रिंकू यांना 570 रुपये वाढीव वीजबील आल्याबाबत जाब विचारला. यानंतर नराधमाने मृत महिलेच्या हातापायावर आणि तोंडावर एकामागोमाग एक असे तब्बल 16 वार केले. (Mahavitaran)

अगदी काही क्षणातच मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर रिंकू यांच्यावर मोरगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. रिंकू बनसोडे यांच्या हत्येमुळे महावितरणमधील कर्मचारी संतप्त झाले असून, या घटनेचा कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. (Mahavitaran)

Nashik Crime | नाशिकमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये डॉक्टरवर हल्ला

570 रुपयांच्या वीज बिलासाठी हल्ला

दरम्यान, आरोपीचे वीजबिल हे रत्नाबाई सोपान पोटे या नावाने असून, चालू एप्रिल 2024 या महिन्याचे 63 युनीट वीजवापराचे वीजबिल हे 570 रुपये इतके आले होते. हे बील ग्राहकाच्या वीज वापरानुसार आणि नवीन दरानुसार योग्य असून, सदर ग्राहकाची वीजबिलासंदर्भात कोणतीही लेखी किंवा ऑनलाईन तक्रारदेखील नोंदवलेली नाही. (Mahavitaran)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here