Maharashtra | बिहारला मागे टाकत महाराष्ट्र दंगलीत अव्वल

0
24
Maharashtra
Maharashtra

Maharashtra |  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात काही जातीय तसेच वादग्रस्त कारणांमुळे दंगलीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या दंगलींच्या घटनांच्या बाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दंगलींमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल स्थानी असल्याची आकडेवारी ही राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जारी केली आहे.

विशेष म्हणजे, सन २०२२ मध्ये राज्यात दंगलींचे तब्बल ८ हजार २१८ गुन्हे दाखल झालेले होते. हत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे तिसऱ्या स्थानी असून, ‘पोक्सो’च्या अंतर्गत गुन्ह्यांमध्येही राज्यात अनेक पटीने वाढ झाल्याचेही ह्या आकडेवारीमधून समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत

Maharashtra Violence: महाराष्ट्र पेट घेत आहे ! 2 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांपासून दंगल, जाळपोळ, तोडफोड; 4 पोलीस जखमी, 31 जण ताब्यात

अशी आहे आकडेवारी

देशभरात सन २०२२ मध्ये दंगलीच्या घटनांचे सर्वाधिक गुन्हे हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.  दरम्यान, ह्या दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्राच्या पाठोपाठ बिहार व उत्तर प्रदेशचाही नंबर आहे. ह्या आकडेवारीनुसार मागील वर्षात महाराष्ट्र राज्यात ८ हजार २१८ इतके दंगलीचे गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, महाराष्ट्रातील ९ हजार ५५८ नागरिक हे दंगलीमुळे प्रभावित झाले असून, दुसऱ्या स्थानी बिहार राज्य असून, मागील वर्षी बिहारमध्ये ४ हजार ७३६ इतक्या दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहेत. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये ४ हजार ४७८ दंगलीचे गुन्हे हे दाखल झाले आहेत. अनुक्रमे उत्तर प्रदेश हे तिसऱ्या स्थानी आहे.

इतके नागरिक दंगलीमुळे प्रभावित

गेल्या वर्षभरामध्ये राज्यात दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ घटनांची नोंद झालेली आहे. ह्या अहवालानुसार IPC कलम १४७ आणि १५१ ह्या अंतर्गत हे सर्व गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यात गेल्या वर्षी राज्यात दंगलीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, ९ हजार ५५८ नागरिक हे ह्या दंगलीच्या घटनांमुळे प्रभावित झाल्याचेही ह्या आकडेवारीवरून दिसत आहे. या दंगलीच्या घटनांच्या प्रकरणांपैकी तब्बल २८ प्रकरणे ही जातीय व धार्मिक मुद्द्यांशी, ७५ प्रकरणे ही राजकीय मुद्द्यांशी तसेच २५ प्रकरणे ही जातींच्या संघर्षांशी संबंधित होती.

संजय राऊत म्हणाले दिल्ली दंगल प्रायोजित, म्हणाले- ‘पंतप्रधानांनीही यावर बोलावे’

महिलांवरील गुन्ह्यांत वाढ

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या ह्या वर्षीच्या वार्षिक अहवालात देशातील महिलांवरील गुन्ह्यांत मोठी वाढ झाल्याचे उगडकिस आले आहे. गेल्या वर्षी तब्बल ४ लाख ४५ हजार २५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्येक तासाला तब्बल ५१ गुन्हे हे महिलांबाबत नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे २०२१ आणि २०२० मधील आकडेवारीपेक्षा मागील वर्षीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.

देशातील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. याची संख्या ३१.४ टक्के इतकी आहे. त्यानंतर महिलांच्या अपहरणाचे १९.२ टक्के गुन्हे दाखल आहेत. तर, महिलांवरील विनयभंगाचे १८.७ टक्के गुन्हे हे दाखल आहेत. बलात्काराचे ७.१ टक्के गुन्हे हे दाखल झालेले असल्याचेही ह्या आकडेवारीतून समोर आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here