Skip to content

खर्डेत राम नवमी उत्साहात साजरी; शुक्रवारी भव्य कुस्त्यांची दंगल


देवळा : खर्डे ता देवळा येथे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली . येथील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवा निमित्ताने सकाळी ९ वाजता ह भ प नवनाथ महाराज खोमणे ,आळंदी देवाची यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला . यावेळी खर्डे व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .

खर्डे ता देवळा येथे राम नवमी निमित्ताने काढण्यात आलेल्या रथाचे औक्षण करतांना महिला व उपस्थित ग्रामस्थ आदी (छाया ; सोमनाथ जगताप )

सायंकाळी संपूर्ण गावातून राम रथाची मिरवणूक काढण्यात आली . या रथाचे जागोजागी महिलांनी औक्षण केले . रात्री ९ वाजता शिव व्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले . खर्डे येथे ग्रामदैवत श्रीराम नवमीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते . या पार्शवभूमीवर यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . उद्या शुक्रवारी( दि ३१ ) रोजी दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून , याचा कुस्ती पट्टूनी लाभ घ्यावा . तसेच शनिवार दि १ रोजी रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशा होणार आहे .

दोन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी खर्डे सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सहभाग असतो . यात्रेत वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली जातात .यात्रा महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी अध्यक्ष हंसराज (बापू) जाधव , उपाध्यक्षपदी शशिकांत (अंतू ) पवार आदींसह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , यात्रा कमिटीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!