Maharashtra Politics : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची जोरदार तयारी चालू आहे. राज्यामध्ये सध्या अनेक विविध घडामोडींना वेग आला असून सर्वच नेते निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कामां तर काही नेते पक्षांतरामध्ये व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवरती आत्ता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा पृथ्वीराज चव्हांणांकडून करण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या या दव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
Political News | ‘त्या’ आमदारांची काँगेसकडून हकालपट्टी; काँगेसमधून बाहेर पडताच ‘भाजपवासी’ होणार..?
Maharashtra Politics | नेमकं प्रकरण काय?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये “मालवण पुतळा प्रकरण बदलापूरची घटना यामुळे जनतेला सरकार विषयी प्रचंड राग आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी राज्यभर संतप्त भावना उमटल्या असून गेल्या 100 वर्षात देशात कधीच पुतळा पडला नाही. केंद्रीय संस्थाने केलेल्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 180 च्या जवळपास जागा मिळतील. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करायची व काही काळानंतर वातावरण शांत झाल्यावर पुन्हा निवडणुकांना सामोरे जायचे.” असे असे वक्तव्य करण्यात आले होते.
Political News | शिंदे फडणवीसांसमोर ठाकरे देणार तगडे आव्हान; कोणता डाव टाकणार..?
“फडणवीस आणि अद्यापही माफी मागितली नाही”
“ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला ते कोणाच्या जवळचे होते. यावरूनही चर्चा सुरू आहेत अशा चर्चांमुळे समाजाचे वातावरण बिघडते. त्यामुळे तातडीने या प्रकरणाची सगळी माहिती जनतेपुढे आली पाहिजे. पुतळ्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफीनामा दिलेला नाही. असेही त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर पर्यंत आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळीमध्ये 29 ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या कालावधी निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू राजवट लागू होणार का? अशी चर्चा होती त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम