Maharashtra Politics | ‘या’ तारखेला होणार नव्या सरकारचा शपथविधी; बावनकुळेंकडून आमदारांना विशेष सुचना

0
25
#image_title

Maharashtra Politics | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरी अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. राज्यामध्ये महायुतीला बहुमताने विजय मिळाला असून मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय न झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तर मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचेही बोलले जात आहे. अशातच मोठी बातमी समोर आली असून राज्यात नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची तारीख आता निश्चित झाली आहे.

Maharashtra Politics | ‘डिसेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होणार’; रावसाहेब दानवेंनी दिला चर्चांना पूर्णविराम

कधी पार पडणार नव्या सरकारचा शपथविधी सोहळा? 

सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या 5 डिसेंबरला पार पडणार असून याकरिता मुंबईतील खास ठिकाण देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार असून या सोहळ्यास भाजपाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर येत्या 2 ते 3 डिसेंबरला भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होणार असून महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी 2 किंवा 3 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार असून यावेळी भाजपा आमदारांची बैठक देखील पार पडणार आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आहे.

Maharashtra Politics | फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात ‘या’ नेत्यांची वर्णी…?

शपथविधी करिता आमदारांना तयार राहण्याच्या सूचना

यावेळी त्यांच्याकडून सर्व आमदारांना येत्या 5 डिसेंबरला राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळ्याकरिता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मुंबई बाहेरील आमदारांना मुंबई देण्यासाठी तयार राहावे. अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करा. असे आवाहन देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here