Maharashtra Politics | विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता स्थापन करण्यासाठी महायुती सज्ज झाली असून त्याकरिता हालचाली सुरू आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली असून यात आता देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
केंद्रात फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे तशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. यासह अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्यामुळे, आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा सोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल असे सांगण्यात येत आहे.
आज महायतीचे नेते दिल्लीला जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात देखील भाजपचे सर्वाधिक मंत्री असणारे असून अजित पवार गट आणि शिंदे गटास समसमान मंत्री पद देण्यात येतील. अशी देखील माहिती समोर आली आहे.
Maharashtra Politics | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार..?; बघा नेमकं प्रकरण काय?
तीनही पक्षांच्या मंत्रिमंडळ यादीत ‘ही’ नावे चर्चेत
भाजपचे मंगल प्रभात लोढा, राहुल कुल, संभाजी पाटील निलंगेकर, संजय कुटे, गणेश नाईक, माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, राणा जगजीतसिंह पाटील यांची नावे समोर आली आहेत. शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली असून यामध्ये एकनाथ शिंदे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, विजय शिवतारे, राजेंद्र यड्रावकर या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाच्या संभाव्य यादीत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्रम, सुनील शेळके, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम