Political News | ‘ईव्हीएममध्ये घोटाळा शक्य!’; महादेव जानकरांच्या दाव्यामुळे खळबळ

0
32
#image_title

Political News | महायुतीने विधानसभा निवडणूका बहुमताने जिंकत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. युतीच्या विजयानंतर आता महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात असून महायुतीतून बाहेर पडलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून खळबळ जनक दावा केला आहे. “महायुतीचा विजय ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे झाला असून, महायुतीतून बाहेर पडण्यामागचे कारण देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Political News | एकनाथ शिंदेंनीच उपमुख्यमंत्री पद घ्यावे भाजपचा आग्रह; काय आहे कारण..? वाचा सविस्तर

ईव्हीएम मुळे देशाची लोकशाही धोक्यात

पत्रकारांशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला असून भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला पडायचे नाही. परंतु अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत.” असा गंभीर आरोप जाणकारांनी यावेळी केला आहे. “ईव्हीएमवर माझा आक्षेप असून ईव्हीएम विरोधात देशभरात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईव्हीएम मुळे देशाची लोकशाही धोक्यात असून ईव्हीएम हॅक करता येते. मी स्वतः इंजिनियर आहे. तेव्हा मला सगळं माहित आहे. त्याचबरोबर, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

Political News | एकनाथ शिंदेंनीच उपमुख्यमंत्री पद घ्यावे भाजपचा आग्रह; काय आहे कारण..? वाचा सविस्तर

येत्या काळात आमची एकला चालोची भूमिका

तसेच युतीतून बाहेर पडण्यामागचे कारणही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले असून “मला युतीचा फार वाईट अनुभव आल्यामुळे मी त्यांच्यातून बाहेर आलो. काँग्रेसला अजून चाखलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात आमची एकला चालोची भूमिका असणार आहे. तसेच माझ्या पक्षाचा राज्यामध्ये सध्या एकच आमदार असून कोणासोबत जायचं याचा निर्णय अजून झालेला नाही. परंतु जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला, तर त्यावर आम्ही कारवाई करू.” असा नाव न घेत रासपचे आमदार रत्नागर गुट्टे यांना इशारा दिला  आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here