Maharashtra News : मुंबई : बदलापुरमधील संतापजनक घटना समोर आली आणि महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून, यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.(Missing Womens)
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, मागील 5 वर्षात राज्यातून 1 लाखांपेक्षा जास्त महिला गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी शहाजी जगताप नामक एका माजी सैनिकाने हायकोर्टात याचिका दाखल केली असून, या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोग व जीआरपीला आपली भूमिका स्पष्ट करून उपाययोजना सुचवण्याचे आदेश केले आहेत. तसेच या प्रकरणी राज्य सरकारलाही न्यायालयाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.
Maharashtra News | शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करा; अब्दुल सत्तारांचे आदेश
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2018 ते 2022 या पाच वर्षांत महाराष्ट्रातील 1 लाखांपेक्षा जास्त महिला गायब झाल्या असून, या बेपत्ता महिलांचा अजूनही काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. तर, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या या आकडेवारीनुसार महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणात देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणी राज्य महिला आयोग आणि मोठ्या प्रमाणात लोक गायब होण्याच्या तक्रारी प्राप्त असलेल्या रेल्वे पोलिसांना चार आठवड्यांत उत्तर देण्याचे आणि यावर उपाययोजना सुचवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. (Women Missing In Maharashtra)
Maharashtra News | महाराष्ट्रातील पाच वर्षाची आकडेवारी
- 2018 : अल्पवयीन मुली – 2,063; महिला – 27,177; एकूण = 29,240
- 2019 : अल्पवयीन मुली – 2,323; महिला – 28,646; एकूण = 30,969
- 2020 : अल्पवयीन मुली – 1,422; महिला – 21,735; एकूण = 23,157
- 2021 : अल्पवयीन मुली – 1,158; महिला – 19,445; एकूण = 20,630
- 2022 : अल्पवयीन मुली – 1,493; महिला – 22,029; एकूण = 23,522
Maharashtra News | दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे
नेमकं प्रकरण काय..?
देशभरातील बेपत्ता होणाऱ्या महिलांसोबत मानवी तस्करी, अनैतिक धंदे व दहशतवादी कारवायांसाठी वापर आणि जबरदस्ती धर्मांतर केले जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील बेपत्ता लाखो महिलांच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एका माजी सैनिकाने जनहित याचिका दाखल केली आहे. अनेकदा या महिलांना परराज्यात किंवा परदेशातही नेलं जातं. हा याविषय अत्यंत गंभीर असून, राज्य सरकारनेही विषयावर तितक्याच गांभीर्याने पाहण्याची आणि ठोस आपुले उचलण्याची गरज व योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याची विनंती या याचिकेत केलेली आहे.(Women Missing In Maharashtra)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम