Maharashtra Drought | दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात आचारसंहिता शिथिल होणार..?

0
28
Maharashtra Drought
Maharashtra Drought

Maharashtra Drought |  राज्यात अनेक भागांत धरणांनी तळ गाठला असून, काही ठिकाणी तर धरणं कोरडे पडले आहेत. तर, दुसरीकडे काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने(Unseasonal Rain) थैमान घातले असून, त्या भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यातील ही संपूर्ण परिस्थिती पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, या दुष्काळजन्य (Drought) परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठे निर्णय घेता यावेत. यासाठी आता येत्या ४८ तासांत आचार संहिता शिथिल केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने कोणतेही सरकारी पातळीवर मोठे निर्णय घेता येत नसून, मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागांचे पाहणी दौरेदेखील करता येत नाही. यामुळे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आता निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याबाबत मागणी केली असून, या विषयावर निवडणूक आयोगही गांभीर्याने विचार करत असून पुढील ४८ तासांत आचार संहिता शिथील केली जाऊ शकते, अशी माहिती महायुतीच्या एका मंत्र्याने दिली आहे. (Maharashtra Drought)

महाराष्ट्रात पाच टप्प्यात ४८ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया (Maharashtra Lok Sabha Election 2024) पार पडली असून, आता निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करावी. जेणेकरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांबाबत निर्णय घेता यावे, अशी मागणी राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यानंतर आता राज्य सरकारच्या मागणीनुसार, पुढील ४८ तासांत राज्यातील आचार संहिता उठवण्याचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics | भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण..; भाजपकडून भुजबळांना घरचा आहेर

Maharashtra Drought | आचारसंहितेचा नियम काय ? 

देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूकीची आचारसंहिताही लागू केली जाते. तर, जोपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होत नाही. तोपर्यंत ही आचारसंहिता लागू असते. दरम्यान, आचारसंहितेच्या काळात विद्यमान सरकार कोणतेही मोठे निर्णय घेऊ शकत नाही किंवा कोणतीही नवी घोषणाही करू शकत नाही. तर, या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा ४ जून रोजी लागणार असून, निकालानंतर नवं सरकार स्थापन व्हायला ८ ते १० दिवस लागतात.(Maharashtra Drought)

मात्र, राज्यातील दुष्काळसदृश्य स्थिती पाहता की निर्णय घेणे आणि काही पावसाळ्यापूर्वी मार्गी लावणे गरजेचे असलेल्या कामांना वेग देण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांना पत्राद्वारे आचारसंहिता शिथील करण्याची मागणी केली असून, मुख्य सचिवांच्या पत्रानंतर आचारसंहितेच्या निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra MLC Election | शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका स्थगित; कधी होणार निवडणूक..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here