Devendra Fadanvis on manusmriti | अखेर फडणवीसांनी स्पष्टच सांगितले; ‘आम्ही कधी विचारही..’

0
66
Jalgaon Lok Sabha Result
Jalgaon Lok Sabha Result

Devendra Fadanvis on manusmriti |  गेल्या अनेक दिवसांपासून शालेय शिक्षणात मनुस्मृतिचा समावेश केला जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावरून अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या होत्या. तर, काल शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाड येथे चवदार तळ्यावर जाऊन निषेध आंदोलन केले. यावेळी त्यांनी मनुस्मृती पुस्तके फाडली आणि चवदार तळ्याचे पाणी पिऊन निषेध व्यक्त केला.

मात्र, यावेळी ही मनुस्मृतीची पुस्तकं फाडत असताना त्यावर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो त्यांच्याकडून अनावधानाने फाडला गेला. हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि एकच संतापाची लाट उसळली. भाजपकडून या मुद्द्यावर विरोधकांना धारेवर धरण्यात आले. अनेक ठिकाणी आव्हाड यांच्याविरोधात निषेधही व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी आता अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्टीकरण दिले असून, ते म्हणले की,”शालेय अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचे श्लोक आणले जाणार नाही”, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Jitendra Awhad | भुजबळांचे वारे शरद पवार गटाच्या दिशेने..?; जितेंद्र आव्हाडांची पाठराखण

Devendra Fadanvis on manusmriti | मोदींच्या प्रचाराला आलो नाही, त्याची गरजही नाही

काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान हा महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. तसेच शालेय अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचे श्लोक आणले जाणार नाही, असे ते म्हणाले. वाराणसी येथे ७ व्या टप्प्यात मतदान होणार असून, सध्या फडणवीस हे मोदींच्या प्रचारार्थ वाराणसी येथे आहेत. यावर ते म्हणाले की,”मी काशी येथे प्रचारासाठी नाही तर येथील लोकांचा उत्साह पाहण्यासाठी आलो आहे. काशी येथे आपण प्रचाराला आलेलो नसून, त्याची गरजही नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे फडणवीस काशीतून बोलताना म्हणाले. (Devendra Fadanvis on manusmriti)

Brijshushan sharan singh | भाजप खासदाराच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनरने दोघांना चिरडले

मनुस्मृतीच्या समावेषाचा विचारही केलेला नाही

महाराष्ट्र सरकारमध्ये कोणीही कुठल्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक घेण्याचा विचारही केलेला नाही आणि असा विचार कधी आलेलाही नाही. तसेच यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यांनीच ही चर्चा आणली आणि आता त्यांनीच हे आंदोलनही केले. एखादा माणूस खोटं आंदोलन करताना कसं काम करतो, हे बघितलं. त्यांनी त्याठिकाणी आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. पण, बाबासाहेबांचा हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here