Maharashtra Politics | भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण..; भाजपकडून भुजबळांना घरचा आहेर

0
66
Maharashtra Politics
Maharashtra Politics

Maharashtra Politics |  लोकसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून महायुतीत चंगलीच खडाजंगी पहायला मिळाली. तर, यावरुन सत्तेत सहभागी असलेला अजित पवार गट आणि त्यांचे नेते नाराज आहेत. दरम्यान, यातच आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या एका वादग्रस्त व्यक्तव्यामुळे त्यांना भाजपकडूनच घरचा आहेर देण्यात आला आहे. “लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून ‘अब की बार ४०० पार’चा नारा देण्यात आला होता.(Maharashtra Politics)

मात्र, त्यांच्या या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप (BJP) आणि मित्रपक्षांसमोर चांगलेच आव्हान निर्माण झाले. त्यांच्या या घोषणेमुळे एकप्रकारे एनडीएचे नुकसान झाले. एनडीए ४०० पार गेल्याने देशाचे संविधान बदलणार नाही. हे लोकांना समजावून देतानाच आमच्या पार नाकीनऊ आले”, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हटले होते. यामुळे आता भाजपमध्ये भुजबळांच्या विरोधात नाराजीचे वातावरण पसरले आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी “छगन भुजबळ यांना आता आवरण्याची गरज असल्याचे” ट्विट केले आहे.

Chhagan Bhujbal | मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही; भाजपला त्यांच्या शब्दाची आठवण करून द्या

Maharashtra Politics | काय म्हणाले निलेश राणे..?

ट्विटमध्ये नीलेश राणे म्हणाले की,”श्री छगन भुजबळा यांना आता आवरलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा मी एक लहान कार्यकर्ता असलो तरीही आम्ही नेहमी भुजबळ यांचं का ऐकून घ्यावं..? मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाही आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. हे भुजबळ नेहमी नेहमी बीजेपीला डिवचत असतात आणि त्यांची ही भूमिका योग्य नाही.(Maharashtra Politics)

आम्हाला असंच पाहिजे आहे, आम्हाला तसंच पाहिजे आहे, युती आघाड्या करून ही अशी भाषा एका मोठ्या नेत्याला शोभणारी नाही.  आम्ही नेहमी तुमच्या वयाचा आदर करतो. पण उठसूट कोणीही युती बिघडवण्याची भाषा करत असेल तर, ते सहन होत नाही आणि होणार देखील नाही. कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनही नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळ ओबीसी १२ बलुतेदार यांचे ‘ओबीसी राजे’

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ २७२ जागांची गरज असते. मात्र, तरीही भाजपने देशात ४०० च्यावर जागा जिंकण्याचा णाराय दिल्याने यावरुन विरोधकांनी, भाजपला ४०० जागा जिंकून देशाचे संविधान बदलायचे असल्याचे आरोप केले. भाजप जिंकल्यास देशातील ही शेवटची निवडणूक असेल आणि ते देशात हुकूमशाही लादतील, असे अनेक आरोप विरोधक करत होते.(Maharashtra Politics)

भाजपाच्या या ४०० पारच्या घोषणेने भाजपासह मित्रपक्षांसमोर निवडणुकीच्या प्रचारात मोठं आव्हान निर्माण झालं असून, देशातील दलित आणि मागास समाजाच्या मनात ही गोष्ट एवढी बिंबवली गेली की, आता भाजपने ४०० हून जास्त जागा जिंकल्यास ते देशाचं संविधान बदलणार, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या मुलाखती आणि सभांमधून यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. ते एका मुलाखतीत १५ ते २० मिनिटे याचेच स्पष्टीकरण देत होते, असे मंत्री छगन भुजबळ म्हटले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here