Loksabha Election | महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ..?

0
13
Loksabha 2024
Loksabha 2024

Loksabha Election |  आगामी लोकसभा निवडणुकींची तारीख ही आता कधीही जाहीर होऊ शकते, असे असताना अद्यापही दोन्ही गोटात जागावाटपावरून द्वंद्व सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यातच टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, विरोधकांच्या म्हणजेच महाविकास आघाडीतील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा सुटला असून, यात ४० जागांचे वाटप झाले आहे. मात्र, अजूनही ८ जागांवरून वाद सुरु आहेत. तर, या जागांबाबत आता तिन्ही पक्षांचे प्रमुख हे चर्चा करून हा तिढा सोडवणार असल्याचे सांगितले जात आहे. आज विरोधी पक्षांची लोकसभा जागावाटपाबाबतची शेवटची बैठक झाली असून, या बैठकीत तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. मात्र, तरीही अजून जवळपास ८ जागांवरून वाद कायम आहेत. (Loksabha Election)

Loksabha Election | कोणत्या पक्षाला किती जागा..?

टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, आज झालेल्या बैठकीत वादग्रस्त ८ जागा वगळता शिवसेना ठाकरे गटासाठी आतापर्यंत १५ जागांचा निर्णय झालेला आहे. तर, यापैकी हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जागा हि ठाकरे गटाने ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’साठी सोडली आहे. तर अकोल्याची जागा ही ठाकरे गटाने ‘वंचित बहुजन आघाडी’साठी सोडली आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला ८ जागा देण्यात आल्या असून, काँग्रेस १४ जागा लढवणार आहे. तर ८ जागांचा वाद अजूनही कायम आहे. दरम्यान, यावर आता तिन्ही पक्षांचे पक्षप्रमुखच तोडगा काढणार असल्याची माहिती समोर येत आहे.(Loksabha Election)

Loksabha Election | लोकसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

कोणती जागा कोणत्या पक्षाला – वाचा यादी

१) रामटेक – निर्णय नाही

२ ) बुलढाणा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

३) यवतमाळ वाशिम -शिवसेना ठाकरे गट

४) हिंगोली – निर्णय नाही

५) परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

६) जालना – निर्णय नाही

७) संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

८) नाशिक – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

९) पालघर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

१०) कल्याण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

११) ठाणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

१२) मुंबई उत्तर पश्चिम – निर्णय नाही

१३) मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

१४) मुंबई ईशान्य – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

१५) मुंबई दक्षिण मध्य – निर्णय नाही

१६) रायगड – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)(Loksabha Election)

१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

१८) मावळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

१९) शिर्डी – निर्णय नाही

२०) धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२१) कोल्हापूर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Loksabha 2024 | नाशिक का खासदार कैसा हो, शांतीगिरी बाबा जैसा हो

२२) हातकणंगले – ( ठाकरे गट – स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याची शक्यता)

२३) अकोला – ( ठाकरे गट – वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्याची शक्यता)

२४) शिरूर – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

२५) सातारा – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

२६) माढा – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

२७) बारामती – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

२८) जळगाव – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

२९) रावेर – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

३०)दिंडोरी – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

३१) बीड – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

३२) अहमदनगर – राष्ट्रवादी (शरद पवार गट)(Loksabha Election)

३३) अमरावती – काँग्रेस

३४) भंडारा – काँग्रेस

३५) चंद्रपूर – काँग्रेस

३६) गडचिरोली – काँग्रेस

३७) नांदेड – काँग्रेस

३८) लातूर – काँग्रेस

३९) धुळे – काँग्रेस

४०) नंदुरबार – काँग्रेस

४१) पुणे – काँग्रेस

४२) सोलापूर – काँग्रेस

४३) सांगली – काँग्रेस

४४) मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस

४५) मुंबई उत्तर – काँग्रेस

४६) भिवंडी – निर्णय नाही

४७) वर्धा – निर्णय नाही

४८) नागपूर – काँग्रेस

याप्रमाणे आजचया शेवटच्या बैठकीत निर्णय झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत ४० जागांच्या वाटपाचा निर्णय झाला असून, अजूनही ८ जागांचा तिढा कायम आहे. (Loksabha Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here